E Pik Pahani ई पीक पाहणी शेवटची तारीख गेली का ?

शेतकरी बंधुनो,

मागच्या एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात  सर्वीकडे संतत धार पाऊस पडत आहे  त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे अशा परिस्थितीत जर आपल्या पिकाचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले तर शासनाकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी  ई  पीक पाहणी  e pik pahani करून घेणे खूप खूप आवश्यक आहे.

आता आपण आपल्या शेतीचा पीक पेरा आपल्या मोबाईल मध्ये लावून घेऊ शकतो यासाठी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे.  राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईल वरून आपण लावलेल्या शेतातील विविध पिकांची ७/१२ सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पूर्वी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत दिलेली होती.  मात्र मागील काही दिवसापासून इंटरनेटचे सर्वर डाऊन असल्याकारणाने अनेक शेतकरी बांधवांना e pik pahani ई पीक पाहणी करता आली नाही.

e pik pahani  ई पिक पाहणी २०२४

अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी बांधव हे ई पीक पाहणी करण्यापासून वंचित राहिलेले होते त्यामुळे या शेतकरी बांधवांना पिक विमा पासून मिळणारा लाभ हा मिळू शकला नसता म्हणून ही मुदत वाढ करण्याची मागणी अनेक शेतकरी बांधव शासनाकडे करत होते.  आणि त्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने e pik pahani ई पीक पाहणी साठी २५ सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ करून दिलेली आहे यामुळे पिक विमा साठी असलेले ई  पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.

ऑनलाइन ई पिक पाहणी २०२४ (e pik pahani) कशी कराल ?

तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ई पिक पाहणी   ॲपचे नवीन वर्जन 3.0.1 हे तुम्हाला आधी डाऊनलोड करून घ्यायचे आहे.  जर मोबाईल मध्ये आधीच ई पिक पाहणी ॲप डाऊनलोड केलेले असेल तर त्याला अपडेट करून घ्यायचे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता केव्हा मिळनार  माहिती जाणून घेण्यासाठी येथे दाबा

e pik pahani त्यानंतर तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण सहा महसूल विभाग आहेत ज्यामध्ये नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती कोकण आणि नागपूर यांचा समावेश होतो या विभागांचा समावेश होतो. तुम्ही राहत असलेला जिल्हा च्या जवळ वरीलपैकी जो जिल्हा येत असेल तो तुमचा महसूल विभाग समजावा आणि त्या विभागाची निवड करावी. त्यानंतर नवीन खातेदार नोंदणी वरती आपल्याला क्लिक करायचे आहे ते क्लिक केल्यावर आपल्याला आपल्या महसूल विभाग दिसून येईल त्याखाली आपल्या जिल्ह्याची तसेच आपल्या तालुक्याची निवड करायची आहे तालुक्याची निवड केल्यानंतर आपल्या गावाची निवड तुम्हला  करायची आहे.

आपल्या गावाची निवड झाल्यानंतर आपल्याला खातेदाराची निवड करायची आहे त्यासाठी खातेदाराचे पहिले नाव मधले नाव किंवा आडनाव आपल्याला लिहायचे आहे किंवा गट क्रमांक  टाकायचा आहे. समजा जर तुम्ही गट क्रमांक टाकला तर त्या गटातील सर्व शेतकऱ्यांची सर्व खातेदारांची नावे आपल्याला दिसून येतील त्यामध्ये आपल्याला ज्या नावाची ई   पिक पाहण्याची नोंदणी करायची आहे ते नाव आपल्याला सिलेक्ट करायचे आहे नंतर पुढे जाऊन खाते क्रमांक आपल्याला बरोबर आहे का ते तपासायचे आहे

ते झाल्यानंतर पुढे जाऊन आपला जो मोबाईल नंबर आहे तो बरोबर आहे ते तपासायचे आहे.नंतर आपल्या मोबाईलवर चार अंकी संख्येत अंक पाठवण्यात येईल तो आपण टाकल्यानंतर आपलं होम पेजवर आपल्या शेताची पिकाची माहिती भरायची आहे. अशाप्रकारे आपण ऑनलाइन ई-पीक पाहण्याचा फॉर्म हा भरू शकतो.

सदरच्या ई  पीक पाहणी एप्लीकेशन मध्ये मिश्र पिकांबरोबर मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदवण्याची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे तसेच आपल्या संपूर्ण गावाची पिक पाहण्याची सुविधा सुद्धा या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या  ऐप  मध्ये शेतकऱ्यांकरता एक मदत बटन देण्यात आलेले असून जर तुम्हाला ई पीक पाहण्याबाबत काही अडचणी आल्या किंवा काही शंका असल्या तर तुम्ही त्या मदत क्रमांकावर संपर्क साधून त्या दूरध्वनी क्रमांकावर बोलून आपल्या अडचणीचे निरसन करू शकतात.

यावर्षी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा उपलब्ध करुन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरलेला आहे . मात्र पिक विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे पीक विमा करतांना नोंदवले आहे त्या पिकाची ई-पीक पाहणीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे. सुरुवातीला शेतकरी स्तरवरील पीक पहाणीचा कालावधी दिनांक १ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ (४५ दिवस) असा होता. पण  आता त्या  कालावधीत १० दिवस मुदतवाढ देऊन दिनांक २५ सप्टेंबर २०२४अशी अंतीम मुदतवाढ देण्यात  आलेली आहे.

E pik Pahani ई पीक पाहणी मध्ये नोंदणी करायचे फायदे

जर आपण ई  पिक पाहणी  मध्ये आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती नोंद केलेली  नसेल तर भविष्यात आपल्याला विमा कंपनीकडून किंवा सरकार कडून  मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये पिक कर्ज, पिक विमा,यामध्ये अडचणी येऊ शकतात. राज्य शासनाकडून २०२१ पासून ई पीक पाहणी  सुरू करण्यात आलेली  आहे आणि या माध्यमातून  शेतकऱ्यांना खरीफ  हंगामातील पिकाची नोंद अँप दारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  पहिल्या वर्षी या योजनेला कमी प्रतिसाद होता परंतु नंतरच्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जी जनजागृती झाली त्यामुळे ई पीक  पाहणीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

e pik pahani पहिल्या वर्षी या योजनेला कमी प्रतिसाद होता परंतु नंतरच्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जी जनजागृती झाली त्यामुळे ई पीक  पाहणीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.राज्यात सरासरी १४२ लाख हेक्‍टरवर खरीप हंगाम घेतला जातो ज्यामध्ये कापूस, भात ,मका, तुर,, सोयाबीन ज्वारी,  मुंग उडीद अशी वेगवेगळी पिके प्रामुख्याने  घेतली जातात. यंदा 15 जुलैपर्यंत 123 लाख हेक्टर वरची पेरणी ही पूर्ण झालेली असून गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पेरणीची गती ही जास्त आहे.

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

Leave a Comment