Pik Vima चला आता घरी बसूनच पिक विमा ची नुकसान भरपाई मिळणार!!

शेतकरी बंधूंनो नमस्कार,

Pik Vima आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये पिक विमा च्या नुकसान भरपाईसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते जाणून घेणार आहोत. आपण सगळे बघतच आहोत की मागील दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, तसेच खानदेश या भागांमध्ये अतिवृष्टी झाली आणि हवामान विभागाचा अंदाज बघितल्यास पुढे सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग यांनी या आधीच वर्तवलेला आहे.

शेतकरी बंधूंना सध्याचे पिकाची अवस्था बघितल्यास सोयाबीन हे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे आणि लवकरच त्याची काढणी होणार आहे बाजरी हे पीक काढणीच्या अवस्थेमध्ये आहे तर कापूस या पिकाला बोंडे लागण्याची अवस्था आहे जर पावसाचे प्रमाण अशाच पद्धतीने पुढे चालू राहिल्यास शेतकरी बंधूंना बऱ्यापैकी नुकसानीला सामोरे जाऊ लागू Pik Vima शकते आता सुद्धा ज्या भागांमध्ये अतिवृष्टी होऊन नदींना पूर आलेला आहे त्या ठिकाणी आधीच शेतकरी बंधूंचे पिकाचे भरपूर नुकसान हे होऊन गेलेले आहे बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये कापूस पिकाची वाढ ही  खुंटलेली दिसत आहे.

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी आढावा घेतला असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत हिंगोली जालना आणि परभणी या जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला. शेतीसह इतरही नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रशासनाने त्वरित मदत करा असे निर्देश उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत.

लखपती दीदी योजना २०२४ विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे दाबा

Pik Vima पिक विमा नुकसान भरपाई २०२४

आता समाधानाची बाब ही आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांनी पिक विमा काढलेला होता त्याच बरोबर ई पिक पाहणी मोबाईल ॲप द्वारे आपल्या शेतीचा पीक पेरा लावून घेतलेला आहे त्यामुळे शासनाकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Pik Vima पिक विमा कंपनीला पूर्वसूचना केव्हा देणार?

सर्वप्रथम आपण खरीप २०२४ चा पिक विमा भरलेला असणे आवश्यक आहे त्यानंतर पीक नुकसानीची पूर्व सूचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासून तीन दिवसाच्या आत म्हणजेच ७२ तासांचा आत पिक विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. या वर्षापासून पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेत जर तुम्ही पूर्व सूचना दिली तर नुकसान भरपाई ही पीक कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे हा विचार न करता  पिकाचे नुकसान किती टक्के झाले आहे यानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी वाढीच्या अंतिम अवस्थेची वाट न बघता नुकसान झाली त्यावेळेस तात्काळ ७२ तासाच्या आत पूर्व सूचना द्यावी ही विनंती

Pik Vima पिक विमा नुकसान भरपाई साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या प्ले स्टोअर या ॲप्लिकेशन मध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्च करायचं आहे पी एम एफ वाय  म्हणजेच प्रधानमंत्री फसल बिमा योजना हे ॲप शोधून डाउनलोड करायचे आहे  पी एम एफ बी वाय हे ॲप डाऊनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन करायचा आहे ओपन झाल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला चार पर्याय दिसतील त्यामध्ये आपली भाषा ही निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर  आपल्याला अप्लाय करायचे आहे.

त्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या चित्राप्रमाणे स्क्रीन दिसेल त्यामध्ये आपल्याला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा हा पर्याय निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर खाली दाखाविल्याप्रमाणे एक नवीन स्क्रीन ओपन होईल तुमच्यासमोर येईल त्यामध्ये पाच निरनिराळे प्रकार दिलेले असतील उदाहरणार्थ विमा पॉलिसीची सद्यस्थिती पीक नुकसान शंखा समाधान मदत केंद्र इत्यादी.

यामध्ये आपल्याला  Pik Vima  पीक नुकसान या ठिकाणी क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय दिसतील त्यामध्ये आपल्याला पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करायचे आहे व नंतर त्यामध्ये आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला नोंदणीचा सोर्स कोणता असे विचारले जाईल त्या ठिकाणी आपल्याला आपण जिथे नोंदणी केली होती त्याविषयीची माहिती टाकावी लागेल. जसं की कोणी जर सीएससी csc सेंटर केली तर csc हा ऑप्शन निवडायचा आहे.समोरची आपली माहिती टाकून आपणाला तो फॉर्म फिल करायचा आहे. नंतर सर्वे नंबर टाकून उपविभाग नंबर टाका आणि समोर क्लिक करा.

हे सर्व झाल्यानंतर आपल्यापुढे एक नवीन ऑप्शन येईल त्यामध्ये आपले नुकसान कशामुळे झालेले आहे त्याची आपल्याला नोंद करावी लागेल उदाहरणार्थ जर तुमचं नुकसान अतिवृष्टीमुळे झाला असेल किंवा एखाद्या प्राण्याच्या नुकसानीमुळे झाल्या असेल अशा प्रकारचे वेगवेगळे कारणे आपल्याला तिथे नोंदवायची आहे.

सध्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे त्यामुळे आपल्याला Excess Rainfall एक्सेस रेन फॉल हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आपल्याला घटना कोणत्या दिवशी घडली ती तारीख नोंदवायची आहे त्याचबरोबर तेव्हा पीक कोणत्या अवस्थेमध्ये होते ते सुद्धा आपल्याला नमूद करायची आहे.पीक वाढीचा टप्पा नमूद करत असताना आपल्याला स्टॅंडिंग क्रॉप standing crop हा ऑप्शन निवडावा लागेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

त्यासोबत आपल्याला पेरणीची दिनांक नुकसान झालेल्या शेताचे क्षेत्रफळ आणि किती टक्के आपले नुकसान झालेले आहे त्या विषयी माहिती भरायची आहे. नंतर आपल्याला आपल्या पिकाचे जे नुकसान झालेले आहे त्याविषयीचा फोटो आणि व्हिडिओ काढायचा आहे व त्या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्या पिकाचा फोटो तसेच व्हिडिओ अपलोड करायचा आहे. नंतर तुम्हाला शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी तुमचे नाव व आधार क्रमांक टाकायचा आहे व आणि ओके बटन दाबून सबमिट करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाच्या नुकसान भरपाई विषयी  पूर्वसूचनेचा अर्ज दाखल करू शकता. Pik Vima

त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक डॉकेट आयडी तुम्हाला पाठविण्यात येईल. या आयडी नंबर वरून आपण पीक विमा कंपनीने आपल्या अर्जावर पुढे कोणती भूमिका घेतली आहे हे आपण घरी बसल्या पी एम एफ बी वाय च्या वेबसाइट  वर जाऊन एप्लीकेशन स्टेटस मध्ये चेक करू शकतो.

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment