Investment of Money पैशांची गुंतवणूक कुठे करावी

वाचक मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार!!

तुम्हा सगळ्यांना दिवाळी आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! काल लक्ष्मी कुबेर पूजन निमित्ताने आपण देवी लक्ष्मी यांची आराधना केली. म्हणूनच आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी पैशांची गुंतवणूक कुठे करावी याविषयी जाणून घेणारा आहोत. Investment of Money

मित्रांनो आजच्या युगामध्ये पैसे कमविणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. प्रत्येक प्रत्येक जण हा  आज कमी अधिक प्रमाणामध्ये पैसा कमवितो आहे. परंतु प्रत्येक जण हा श्रीमंत होऊ शकत नाही आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे की आपण आपल्या कष्टाने कमाविलेल्या पैशाला कशा प्रकारे वाढवू शकतो याचे पुरेसे ज्ञान प्रत्येकाकडे नाही.

Investment of Money यासाठी आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी या जाणून घ्याव्या लागतील गुंतवणूक म्हणजे काय?  लाईफ इन्शुरन्स(जीवन विमा) म्हणजे काय? यातील फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार कोणते त्यातील जोखीम काय आहे परतावा किती मिळू शकतो त्याच बरोबर इन्शुरन्स चे वेगवेगळे प्रकार कोणते टर्म इन्शुरन्स म्हणजे काय मेडिकल इन्शुरन्स म्हणजे काय ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला जाणून घ्यावे लागतील.

आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, परंतु पैशाविषयीचे फारसे ज्ञान सध्या तरी त्यामध्ये दिले जात नाही पैशाची बचत करायला आपल्याला लहानपणापासून सांगितले गेले आहे. शिकविले गेले आहे. परंतु बचत केलेला पैसा कशा पद्धतीने वाढवावा त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी याविषयी मात्र कुठल्याच प्रकारे ज्ञान आपल्याला दिले गेलेले नाही. Investment of Money

          महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये Investment of Money गुंतवणुकीची प्रमुख प्रकार कोणते त्याचबरोबर (इन्शुरन्स) विमा चे वेगवेगळे प्रकार कोणते त्याविषयी प्राथमिक माहिती घेणार आहोत.

पैशांची गुंतवणूक म्हणजे काय?

Investment of Money मित्रांनो पैशांची गुंतवणूक म्हणजे नंतर अधिक पैसे मिळविण्याच्या वचनबद्धतेसह बँक, व्यवसाय, किंवा एखादी मालमत्तेमध्ये पैसे ठेवण्याची कृती होय. आता अधिक पैसे म्हणजेच महागाई ज्या प्रमाणात वाढत आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात गुंतवलेले पैसे परत मिळणे म्हणजेच ती गुंतवणूक चांगली गुंतवणूक म्हटली जाऊ शकते.

जीवन विमा म्हणजे पॉलिसी घेणारी व्यक्ती आणि इन्शुरन्स कंपनी यांच्यातील करार नामा ज्याद्वारे पॉलिसी घेणारी व्यक्ती एक निश्चित रकमेचा प्रीमियम इन्शुरन्स कंपनीला देईल आणि त्या बदल्यात इन्शुरन्स कंपनी विमा पॉलिसी धारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा संबंधित पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पॉलिसी धारकाला किंवा त्याचा वारासदाराला रक्कम प्रदान करेल.

मित्रांनो जीवन विम्यामध्ये महागाई किती टक्क्यांनी वाढत आहे याविषयी कुठलाच उल्लेख केलेला नसतो. कारण जीवन विमा चा मुख्य उद्देश आपण नसताना आपल्या परिवाराला ठराविक रकमेची आर्थिक मदत व्हावी हा असतो. या उलट गुंतवणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त परतावा मिळावा हा मुख्य उद्देश असतो. ही महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी आधी समजून घ्यायला हवी. सर्वसाधारणपणे इन्शुरन्स मध्ये १५ किंवा २० वर्षानंतर मिळणारे रिटर्न्स हे ६-७ % च्या दरम्यान असतात. Investment of Money

               गहू पिकाच्या लागवडी विषयी जाणून घेण्यासाठी येथे दाबा

सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाकडे आरोग्य विमा असणे खूप गरजेचे आहे कारण दिवसेंदिवस निरनिराळ्या आजारांचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि म्हणूनच आपली आयुष्यभराची जमापुंजी आजारपणामध्ये नष्ट होऊ नये  त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा असणे खूप आवश्यक आहे.

आरोग्य विमा सोबत एक टर्म प्लॅन प्रत्येकाकडे असणे खूप आवश्यक आहे सध्या तुम्ही जेवढ्या कमी वयामध्ये टर्म प्लॅन घ्याल त्याचा भविष्यात कमी प्रीमियम तुम्हाला द्यावा लागेल टर्म प्लान चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दुर्दैवाने आपले आपल्या जीवाचे जर काही वाईट झाले तर आपल्या परिवाराला एक ठोक रक्कम ही मिळते. जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म प्लॅन असेल तर इतर विमा प्रॉडक्ट मध्ये गुंतवण्याची काहीही गरज नाही.

Investment of Money

Investment of Money 2024

पैशांची गुंतवणूक करण्यामागचा आपला मुख्य उद्देश हा जास्त प्रमाणात नफा कमविणे हा असतो त्यासाठी गुंतवणुकीचे खालील पर्याय उपलब्ध आहेत.

गुंतवणुकीचे पर्याय:

  1. रियल इस्टेट : ओपन प्लॉट (NA44), फ्लॅट : ही एक मोठ्या किंमतीची गुंतवणूक असून यासाठी आपल्याजवळ बऱ्यापैकी पैसा उपलब्ध असणे आवश्यक आहे तसेच या गुंतवणुकीचा एक दोष म्हणजे गरजेच्या वेळेस आपण ही गुंतवणूक लगेचच मोकळी करू शकू असे नाही.
  2. सोने : ही एक अतिशय सुरक्षित अशी गुंतवणूक मानली जाते  जी की गरजेच्या वेळेस आपल्या तात्काळ मोकळी करता येऊ शकते.
  3. शेती : ह्या गुंतवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैशांची उपलब्धता असणे तसेच योग्य ती माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे आणि हिचा सुद्धा एक तोटा म्हणजे गरजेच्या वेळेस ही गुंतवणूक तात्काळ आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही.
  4. म्युचल फंड (Mutual Fund) : ही एक अतिशय चांगली गुंतवणूक असून दर महिन्याला कमीत कमी पाचशे रुपयांपासून सुद्धा सुरुवात करू शकतात आणि योग्य म्युचल फंडाची निवड करून सतत साधारण आठ ते दहा वर्षांसाठी जर गुंतवणूक करू शकला तर तुम्हाला चांगल्यापैकी परतावा यामध्ये मिळू शकतात तसेच ही गुंतवणूक तुम्ही केव्हाही कधीही अगदी सहज मोकळी करू शकता ( शेअर मार्केटच्या जोखमीच्या अधीन)

                             म्युचल फंड विषयी अधिक माहितीसाठी येथे दाबा

5. शेअर बाजार (Stock Market) : हा थोड्या जोखमीचा गुंतवणुकीचा पर्याय असून तुमच्या आर्थिक सल्लागारा शी           चर्चा करू करून तुम्ही हा पर्याय निवडू शकता.

6. फिक्स डिपॉजिट (Fixed Deposit): तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये किंवा ती वित्तीय संस्थेमध्ये जाऊन हा पर्याय                 निवडू शकता अतिशय सुरक्षित असा हा पर्याय आहे. परंतु याच्यामध्ये अतिशय अल्प प्रमाणात परतावा मिळतो

आपल्या पुढील भागात आपण गुंतवणुकीच्या या वेगवेगळ्या पर्यायांबाबत सखोल चर्चा करू.

           महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

 

 

Leave a Comment