Sr Citizens Bones Care ज्येष्ठ नागरिकांनी हाडांची काळजी कशी घ्यावी?

वाचक मित्र आणि मैत्रिणिनो  नमस्कार !

आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये एका महत्त्वाच्या विषयावर Bones Care चर्चा करणार आहोत.परमात्म्याने आपल्याला जे जीवन दिलेले आहे त्यासाठी प्रत्येकाने देवाचे आभार हे मानलेच पाहिजे.मानवरूपी देहात जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला बालपण, तरुणपण,प्रौढपण आणि  वृद्धपण या चारही अवस्थांमधुन  जावे हे लागणारच आहे.

Bones Care

Bones Care वरील चारही अवस्थांमध्ये सगळ्यात चांगली आणि सुखकारक अवस्था म्हणजे आपल्या  प्रत्येकाचे  बालपण ! आपण प्रत्येक जण लहान असताना सर्वात जास्त आनंदी सुखी असतो याचे  मुख्य कारण म्हणजे त्यावेळेस आपले  मन एकदम शुद्ध आणि निर्मळ असते. इतरांविषईच्या कुठल्याही  प्रकारचा द्वेष,राग,लोभ,मोह या भावना लहानपणी  आपल्या मनात नसतात आणि म्हणूनच  लहान मुलं म्हणजे देवाघरची फुले ! असे म्हटले जाते कारण ते अतिशय निरागस असतात.

           महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

आपल्या महाराष्ट्राचे थोर संत श्री तुकाराम महाराज यांनी त्यांच्या एका अभंगात सांगितले आहे “लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठेपणा तया यातना कठीण” आणि ही गोष्ट आता २१ व्या शतकात आजच्या आधुनिक काळात सुद्धा तंतोतंत लागू पडते लागू पडत आहे कारण मनुष्य जसजसा मोठा होतो तस तसे त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात कष्ट वाढत जातात याउलट लहान असताना बालक हा अतिशय आनंदाने आणि स्वच्छने राहात असतो.

Bones Care 2024

सांगायचे तात्पर्य म्हणजे की मोठे झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या जबाबदाऱ्या वाढत असतात त्याचप्रमाणे आपले शरीर हे सुद्धा हळूहळू झिजत चाललेले असते. म्हातारपणामध्ये आपले हाडे हे आपण तरुण असताना जेवढे मजबूत होते तेवढे मजबूत असणे शक्य नाही आणि मग वयाच्या ६० ठी नंतर नैसर्गिक रित्या आपल्या हाडांमधील कॅल्शियम चे प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला लागते.आपल्या प्रत्येकाच्या घरात कोणीतरी जेष्ठ नागरिक असतातच. Bones Care

       प्रधानमंत्री जेष्ठ नागरिक आरोग्य विमा विषयी माहिती येथे बघा

अशा परिस्थितीमध्ये जर ज्येष्ठ नागरिकांचे हाड मोडले तर त्यांना प्रचंड त्रासातून जावे लागते आणि म्हणूनच आज आपण आपल्या ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत की ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हाडांची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी जेणेकरून आपल्यावरती हाड मोडण्याचा प्रसंग हा येणार नाही. आपण आपल्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील तर कशाप्रकारे त्यांची काळजी घेऊ शकतो याविषयी आज जाणून घेणार आहोत

मैत्रिणींनो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे (Prevention Is Better Than Cure)प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याचा अर्थ असा की रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होणारच नाही यासाठी जर आपण काही उपाययोजना केल्या तर ती गोष्ट आपल्या सर्वांसाठी नेहमीच चांगली असणार आहे. Bones care

Bones care हाड मोडू नये म्हणून काय  काळजी घ्याल :-

1.कोणत्याही परिस्थितीमध्ये जेष्ठ नागरिकांनी खुर्चीवर किंवा टेबल वरती चढू नये.कारण चुकून जरी आपल्या शरीराचा तोल गेला तर खाली पडल्यावर हाडाचे फ्रॅक्चर (तडा जाण्याची )व्हायची शक्यता अधिक प्रमाणात असते.

2.पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असताना शक्य असेल तर बाहेर पायी जाण्याचे टाळावे कारण रस्ते ओले असल्याकारणाने पाय घसरून पडण्याची शक्यता ही वाढते.

3.ज्येष्ठ नागरिकांनी आंघोळ झाल्यानंतर बाथरूम मध्ये आपले अंग स्वच्छ पुसून दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन खुर्चीवर किंवा बेडवर बसून आपले अंतर्वस्त्र परिधान करणे.ही गोष्ट याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण बाथरूम मध्ये आधीच फरशी (जमीन) ओली  असते अशा परिस्थितीत एका पायावरती उभे राहून कपडे परिधान करत असताना ज्येष्ठ नागरिकांचा तोल जायची शक्यता ही वाढलेली असते.ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे ज्यांच्या सोबत जेष्ठ व्यक्ती राहत  आहेत.

4.आपल्या घरामध्ये जमिनीवरती/ फ्लोअर वरती कोणती पण गोष्ट विशेष करून प्लास्टिक ची पिशवी, पॉलीथेनं पेपर कागद, पानी, ही इकडे तिकडे पडलेली नसावी कारण जर चुकून जेष्ठ नागरिकांचा त्याच्यावर पाय पडला तर तोल जाऊन खाली पडण्याची व हाड मोडण्याची  शक्यता ही वाढलेली असते..खास करून रात्री या गोष्टी व्यवस्थित आवरलेल्या पाहिजे कारण रात्रभरामध्ये जर  कोणाला बाथरूमला जायचे असेल तर अंधाऱ्या खोलीत जात असताना पाय घसरून पडण्याची शक्यता कमी होते.

5.ज्येष्ठ नागरिकांनी रात्री झोपेतून उठल्यानंतर जर बाथरूम करण्यासाठी जायचं असेल किंवा पाणी पिण्यासाठी जायचं असेल तर उठल्यानंतर आपल्या बेडवरती दोन ते तीन मिनिटं शांत बसायचं आहे मग लाईट ऑन केल्यानंतरच जायचे आहे.

6.तसेच रात्रीच्या वेळेस जेष्ठ नागरिकांनी बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये गेल्यावर शक्य असल्यास आतून दरवाजा बंद करू नये.कारण रात्री बाथरूम मध्ये किंवा टॉयलेट मध्ये पाय घसरून पडल्यावर किंवा इतर कारणामुळे इजा झाल्यावर त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी या गोष्टीची मदत होऊ शकते.शक्य असल्यास ज्येष्ठ नागरिकांसाठी बाथरूम मध्ये एखादी बेल ठेवा जेणेकरून त्यांनी बेल दाबल्यावर त्यांना तात्काळ मदत करता येऊ शकते.

7.सर्वात शेवटी पायी चालणे हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार दररोज जमेल  तेवढे पायी चालायला हवे म्हणजे नैसर्गिकरित्या तुमचे हाडे हे जास्त कालावधीपर्यंत मजबूत राहतील.

              महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!
                 डायबेटिस मधुमेह विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे दाबा !

Leave a Comment