What is Diabetes मधुमेह म्हणजे काय ?

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार !!

भारतात, अंदाजे ७७ दशलक्ष लोक १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मधुमेहाने Diabetes ग्रस्त आहेत (टाइप 2) आणि जवळपास २५ दशलक्ष प्रीडायबेटिस आहेत (नजीकच्या भविष्यात मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे). ५०% पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल माहिती नसते ज्यामुळे लवकर शोधून उपचार न केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवतात.मधुमेह असलेल्या प्रौढांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका दोन ते तीन पटीने वाढतो.

Diabetes

                लेक लाडकी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा 

दिनांक १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक Diabetes मधुमेह दिन म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो म्हणून आज आपल्या ब्लॉगमध्ये आपण मधुमेह म्हणजे काय याविषयी जाणून घेणार आहोत.घरी आलेल्या पाहुण्यांना आपण हा प्रश्न अगदी सहज विचारतो चहात साखर हवी कि बिनासाखरेचा हवा.यावरून आपल्या लक्षात येईल की मधुमेह किती मोठ्या प्रमाणात पसरलाय.मधुमेह याचा शब्दशः अर्थ विचारात घेतला तर मधु म्हणजे गोड आणि मेह म्हणजे लघवी याचाच अर्थ असा की लघवीत साखर-ग्लुकोज चे प्रमाण जास्त असणे.

         महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

लघवीत ग्लुकोज येते याचा अर्थ रक्तात ग्लुकोज चे  प्रमाण वाढलेले असणार हे नक्की ! लघवी तयार होताना मूत्रपिंड गाळलेल्या रक्तातून ग्लुकोज पुन्हा शोषून घेत असते, त्यामुळे लघवीत ग्लुकोज येत नाही परंतु प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज जर रक्तात असेल तर हे पुन्हा शोषण मूत्रपिंडाच्या आवाक्या बाहेर जाते आणि लघवीत ग्लुकोज यायला सुरुवात होते.रक्तात प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज सातत्याने असणे म्हणजेच मधुमेह. Diabetes

Diabetes 2024

नॉर्मल शुगर लेवल ( रक्तातील साखरेची पातळी) म्हणजे किती?

उपाशी पोटी रक्तातील साखरेची पातळी १०० mg/dL (५.६ mmol/L) पेक्षा कमी असणे सामान्य आहे.उपाशी पोटी रक्तातील साखरेची पातळी १०० ते १२५ mg/dL प्रीडायबेटिस मानली जाते. उपाशी पोटी रक्तातील साखरेची पातळी १२६ mg/dL पेक्षा जास्त असल्यास डायबिटीस असण्याची शक्यता वाढते.त्यासाठी पुन्हा रक्ताच्या विशेष चाचण्या करून खात्री केली जाते.खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी १४० ते १८०  mg/dL असणे सामान्य आहे.जेवल्यानंतर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे वाढत असते आणि सर्वसाधारणपणे दोन तासानंतर हे पूर्ववत होते.

Diabetes रक्तातील ग्लुकोज (साखरेची पातळी) कशामुळे वाढते ?

आपण जेवण करतो त्यानंतर जठर आणि लहान आतड्यांमध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होते.कार्बोहायड्रेट्स सारख्या अन्नपदार्थाचे रूपांतर लहान आतड्यांमध्ये ग्लुकोज मध्ये होते. लहान आतड्यातून ते ग्लुकोज रक्ताद्वारे प्रथम यकृतात जाते आणि नंतर गरजेनुसार यकृताच्या (Liver) मार्गदर्शनाखाली संपूर्ण शरीर भरून रक्ताद्वारे पसरवले जाते.

ग्लुकोज हे प्रत्येक पेशीचे इंधन आहे ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोजचे रूपांतर कार्बन डाय-ऑक्साइड मध्ये होते आणि त्यातून निर्माण झालेले ऊर्जा प्रत्येक पेशी ही स्वतःच्या कार्यासाठी जगण्यासाठी वापरत असते.आपल्या शरीरात पेशी असतात पेशींच्या आजूबाजूला रक्त असते त्यात ग्लुकोज असते, परंतु पेशी ऊर्जा तयार करू शकत नाही. पेशी बाहेर ग्लुकोज असते, पण पेशी उपाशी असतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जोपर्यंत रक्तात इन्सुलिन हे संप्रेरक सोडले जात  नाही तोपर्यंत.

इन्सुलिन हे संप्रेरक हार्मोन आपल्या शरीरातील स्वादुपिंड ही  ग्रंथी तयार करते, व रक्तात सोडते. रक्ताबरोबर फिरत फिरत हे संप्रेरक पेशींच्या बाहेर येऊन दाखल होते, आणि ग्लुकोज आत घ्या असे फर्मान सोडते अर्थात हा संवाद रासायनिक भाषेत केला जातो. पेशींनी  ग्लुकोज शोषून घेतल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते म्हणजेच ती नियंत्रणात राहते. आपले जेवण झाल्यानंतर इन्सुलिन हे रक्तात सोडले जाते कारण जेवणानंतर  रक्तातील ग्लुकोज चे  प्रमाण वाढते आणि ते कमी करण्यासाठी इन्सुलिनची गरज भासते.

Diabetes मधुमेह हा क्षणाक्षणाने आणि कणाकणाने  मारणारा रोग आहे जर आपण योग्य काळजी घेतली नाही नियमित पणे मधुमेहाचे पथ्य पालन करणे खूप आवश्यक आहे एकदा का तुम्हाला मधुमेह आजाराने  पकडले की शेवटपर्यंत तो तुम्हाला सोडत नाही परंतु त्याला जर तुम्ही नियंत्रणात ठेवले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही.  मधुमेह नियंत्रणात ठेवुन  मधुमेह नव्वदी पार केलेले भरपूर लोक आपल्याला समाजात पाहायला मिळतात.

Diabetes मधुमेह नियंत्रण त्रिसूत्री:

खाली दिलेल्या त्रिसूत्रीने आपण मधुमेहाला सहज आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो.

  1. नियमित आणि योग्य प्रमाणात आहार.
  2. नियमित व्यायाम आणि
  3. नियमित औषधे

मित्रांनो मधुमेहाला जर आपण नियंत्रणात ठेवला नाही तर त्याच्याबरोबर तो त्याच्या अनेक मित्रांना आणि आपल्या शत्रूंना आपल्या शरीरात घेऊन येतो आणि घर करतो उदाहरणार्थ हृदयरोग रक्तवाहिन्यांचे विकार हार्ट अटॅक चेतापेशींची हानी किडनी प्रॉब्लेम अधु दृष्टी  किंवा कायमचे अंधत्व इत्यादी अनेक…

           बाजरीच्या भाकरीचा आणि डायबिटीस चा काय आहे काय आहे संबंध येथे दाबा

          महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

Leave a Comment