Flood Warning कोल्हापूर महापूर पूरस्थितीचा धोक्याचा इशारा कसा ओळखाल ?

सध्या पावसाळा सुरू झालेला आहे मान्सूनचे आगमन संपूर्ण महाराष्ट्रभर कमी अधिक प्रमाणात झालेले आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. याअतिवृष्टीमुळे पंचगंगा नदी धोका पातळीच्या उंबरठ्यावर पोचली आहे त्यामुळे कोल्हापूरला महापुराचा Flood विळखा पडलेला आहे.

आपणा सगळ्यांना माहितीच आहे की वर्षे 2021 मध्ये महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र मध्ये जो Flood महापूर आला आणि भूसखलन झाले त्यामुळे जवळपास अडीचशे होऊन अधिक लोक हे ही मृत्युमुखी पडली आणि शेकडो लोक हे अजूनही बेपत्ता झालेले आहेत अशा वेळेस जर आपल्याकडे अशी एखादी यंत्रणा असली की जी पूर येण्या अगोदर आपल्याला सुचित करत असेल सावधान करत असेल तर किती बरे होईल.

समजा आपण एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जायला निघालो ते शहर एखाद्या नदीजवळ असेल, डोंगराला लागून असेल अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आपली सुट्टी आनंदाने घालवत असू. अचानक एखाद्या दिवशी अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे तिथे असलेल्या नदीला पूर यायला सुरुवात झाली तर आपल्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब होऊ शकतो. Flood पूरस्थितीचा धोक्याच्या इशारामुळे आपण त्या ठिकाणी अडकून पडू शकतो.

Flood Warning पूरस्थितीचा धोक्याचा इशारा कसा ओळखाल ?

आपण नवीन ठिकाणी गेलो असल्यामुळे तिथल्या पावसाची परिस्थिती, नदीचा पूर याबद्दल आपल्याला कुठलीच कल्पना नसते शहरातल्या नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे का? पूरस्थितीचा  धोक्याचा इशारा Flood आहे का? याबद्दल आपल्याला कुठलीच माहिती नसते. हे तर झालं नदीकाठच्या गावाविषयी. सध्या ग्लोबल वार्मिंग मुळे मान्सून सुद्धा अनियमित झालेला आहे.

बऱ्याचदा आपण बघत असतो किंवा ऐकत असतो की अमुक एका  शहरामध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला. शहरांमध्ये पूर येण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे शहरातील जुने बुजवलेल्या नाल्या ओढ्यांवर केलेले बांधकाम त्यामुळे पाणी जायला पुरेशी जागा नसते परिणामी पूर येतो.

शहरवासीयांना जर हे आधी कळले तर जीवित हानी तसेच वित्त हानी  सुद्धा बऱ्यापैकी टाळता येईल त्याचबरोबर बचावाच नियोजन करणे सुद्धा सोपे होईल. जर आपल्याकडे एखादी अशी सुविधा असली की ज्यामुळे अशा  नवीन ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी येणार असणारया संभाव्य Flood   पूरस्थितीचा धोक्याचा इशारा आपल्या मोबाईलवर उपलब्ध झाला तर सुट्टीचे नियोजन हे अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

Flood फ्लड वॉच इंडिया ऐप

थोडक्यात सांगायचे म्हटले तर  पूरस्थितीचा अंदाज घेणे शक्य आहे का? या सर्वांची माहिती आपल्याला आधी भेटू शकते का? पूर आपल्या गावात आणि धोक्याच्या इशारा आपल्या मोबाईलवर ही गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते का? या प्रश्नाचे उत्तर आहे हो.गुगल मॅप च्या साह्याने तसेच फ्लड वॉच इंडिया ह्या एप्लीकेशन द्वारे आता आपल्या भागातील नदीवर कधी  पूर येणार आहे ही माहिती घेणे शक्य झाले आहे. ह्या एप्लीकेशन द्वारे आपल्याला कमीत कमी २४ तास जास्तीत जास्त ७ दिवस आधी पूरस्थितीचा धोक्याचा Flood इशारा मिळू शकतो.

केंद्रीय जल आयोग ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण अशी तांत्रिक संस्था आहे ही संस्था सध्या भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनर्जीवन विभागाचे संलग्न कार्यालय म्हणून कार्यालय म्हणून काम करत आहे. केंद्रीय जल आयोग या संस्थेने आपल्या देशाच्या नागरिकांसाठी एक फ्लड वाच एप्लीकेशन(FloodWatch Application) डेव्हलप केलेले आहे बनवलेले आहे जे तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात.

फ्लड वॉच एप्लीकेशन चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे ॲप आपल्याला आपण ज्या ठिकाणी राहू किंवा ज्या नवीन ठिकाणी फिरायला जाऊ त्या ठिकाणी असलेल्या नदीची पाण्याची लेव्हलची पातळी किती आहे ते आपल्याला सहज कळू शकते सध्याच्या पाण्याच्या लेव्हलची पातळी, त्याचबरोबर वार्निंग लेव्हल ची पाण्याची पातळी, डेंजर लेवलची पाण्याची पातळी ,हायेस्ट  फ्लड लेवल पाण्याची पातळी अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपणास एका क्षणात मिळते त्यासाठी आपल्याला फक्त प्ले स्टोर वरून एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे व आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपल्या मोबाईलचे जीपीएस सिग्नल हा सुद्धा आपल्याला चालू ठेवायचा आहे.

Flood फ्लड वॉच इंडिया एप्लीकेशन चे महत्व

Flood फ्लड वॉच एप्लीकेशन द्वारे आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील नद्यांची सध्याची पाण्याची पातळी त्याचबरोबर धोक्याची पाण्याची पातळी हे सहज बघू शकतो तसेच नद्याच्या जवळील असलेले खोरे यांची सुद्धा आपल्याला अद्यावत पाण्याची लेवल विषयीची माहिती तात्काळ आपल्या मोबाईलवर भेटू शकते.

आपल्या देशाचे केंद्रीय जल आयोगाचे त्यावेळेसचे अध्यक्ष श्री कुशिंदर ओहरा यांनी हे Flood फ्लड वॉच हे एप्लीकेशन लॉन्च केले होते की जे आपल्याला रियल टाईम मध्ये कमीत कमी 24 तासात तसेच जास्तीत जास्त सात दिवसाच्या दरम्यान होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज आपल्याला देते. Flood फ्लड फोरकास्ट या ॲपद्वारे आपण आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कुठल्याही राज्याच्या मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या नद्यांची पातळी तसेच धोक्याची पातळी सध्याची पातळी करंट पातळी ही सहज बघू शकतो.

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  Flood फ्लड वॉच ॲप डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स खालील प्रमाणे आहेत:
  1. गुगल प्ले स्टोअर उघडा आणि गुगल प्ले स्टोअर उघडा आणि FloodWatch ॲप शोधा.
  2. Flood Watch नावाचे एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर मध्ये ओपन करून नंतर ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये  इन्स्टॉल करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही Flood Watch ॲप चा युज करू शकता

सध्या ही सर्व माहिती इंग्लिश मध्ये आहे लवकरच ती आपल्या मराठी भाषा मध्ये सुद्धा  उपलब्ध करण्यात येणार     आहे.

Leave a Comment