Gharkam karnarya mahilansati yojana घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

वाचक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये Gharkam karnarya mahilansati yojana घरकाम करणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण  मंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी जाणून घेणार आहोत.

बऱ्याचदा आपण बघतो घरगुती काम करणाऱ्या महिला ह्या  आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यांच्यावर मुलांच्या संगोपनाची तसेच शिक्षणाची जबाबदारी असते त्याचबरोबर त्यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी असते त्यामुळे अत्यंत कमी पगारात कोणाच्यातरी घरी जाऊन धुणे  भांडी करणे ,जेवण बनविणे, साफसफाई करणे ,अशी निरनिराळी कामे त्या  करत असतात. Gharkam karnarya mahilansati yojana

सौर कृषी पंप योजनेची माहिती साठी येथे दाबा

सध्याच्या महागाईच्या युगात एवढ्या तुटपुंज्या पगारात स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी या सर्व समस्यांचा विचार करून मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार कामगार कल्याण निधी व स्वायत्त मंडळाची स्थापना झाली. १ जुले १९५३ रोजी स्थापन झालेल्या “मुंबई कामगार कल्याण मंडळ ” १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ” महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ” असे नामांतर झाले.

Gharkam karnarya mahilansati yojana  घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना २०२४

कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कामगार कल्याण योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे.सदर मंडळ त्यातील कल्याण केंद्रांच्या मार्फत कामगार कल्याणाच्या विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ केवळ कामगारांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मिळतात.

Gharkam karnarya mahilansati yojana महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मिशन

विविध कल्याणकारी सेवा रास्त मूल्यामध्ये व दर्जेदार रीतीने पुरविणे व त्यायोगे सदोदित सुधारणा करीत ध्येय गाठणे. त्याकरिता :

  • उत्तम दर्जाच्या क्रीडा व खेळ सुविधा पुरविणे.
  • अद्ययावत ग्रंथालय व वाचनालय उपलब्ध करून देणे.
  • शिक्षणाच्या आधुनिक सुविधा पुरविणे.
  • बालवाडया व शिशुमंदिरे चालविणे
  •  शिवणकाम, भरतकाम, हस्तकला वर्ग चालविणे
  • विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
  • आरोग्यदायी सुविधा पुरविणे.
  • आधारभूत सेवा पुरविणे.
  • विनामुल्य कायदेशीर सल्ला पुरविणे.

घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना

सदर अधिनियमाच्या कलम १० अन्वये घरेलू कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.

मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ  Gharkam karnarya mahilansati yojana

 जनश्री विमा योजना

  • घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिले जातात.
  • जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास रु. ३००००/- देण्यात येते.
  • अपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारस रु. ७५००० /- देण्यात येते.
  • अपघातामुळे कायम स्वरुपी संपुर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास रु. ७५००० /- देण्यात येते.
  • अपघातामुळे कायमस्वरूपी अशत: अपंगत्व आल्यास सभासदास रू. ३७५०० /- देण्यात येते.
  • याशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२  वी करिता तसेच आय.टी.आय. चा कोर्स करीत असल्यास, दरवर्षी उर्त्तीण होत असल्यास, दर तिमाही करिता रु.300/- इतकी रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता ) देण्यात येते.

कौशल्य विकास प्रशिक्षण

या योजनेअत्नर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्यांना शिकावू उमेदवार प्रशिक्षण व मॉड्यूलर एम्प्लॉएबल स्किम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. सदर योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणार आहे.

प्रसूती लाभ

या योजनेअंतर्गत घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्याअंतर्गत घरेलू कामगारास 2 अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता 5,000/- रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत पदविका पदवी अभ्यासक्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या मुला-मुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे ९००/- रुपये व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी ६५०/- रुपये मंडळातर्फे देण्यात येतात.

योजनेचे लाभार्थी

  • नोंदणीकृत घरकाम कामगार. घरकाम करणाऱ्या महिलांनी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे.

कामगारांना होणार फायदा

  • या योजनेअंतर्गत घरकाम करणाऱ्या कामगारांचे जीवनमान सुधारेल.
  • घरकाम कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • घरकाम करणाऱ्या व्यक्तींना मुलांच्या उपचारासाठी, शिक्षणासाठी तसेच इतर गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

घरकाम  कामगार योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचा तपशील
  • जेथे काम करत आहे तेथील मालकाचे संपूर्ण नाव व पत्ता

घरगुती कामगार कल्याण योजना अंतर्गत अर्ज कोठे करावा

  • आपल्या क्षेत्रातील जिल्हा सहाय्यक कामगार अधिकारी याच्या कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा.
  • अर्जाचा नमुना बघण्यासाठी येथे दाबा.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

Leave a Comment