Heart Attack हृदय रोगाची काळजी कशी घ्याल

वाचक मित्र आणि मैत्रिणींनो,

नमस्कार !  दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला गेला. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपला भारत देश हळूहळू हृदय रोगींची राजधानी बनत आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये हार्ट अटॅक हृदयरोग या संदर्भात थोडी माहिती जाणून घेणार आहोत. Heart Attack

मित्रांनो इंग्लिश मध्ये एक म्हण आहे  “ Prevention is Better than Cure” म्हणजे  रोग झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून उपाययोजना करणे . नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांनी सादर केलेल्या अहवालानुसार हृदय रोग संबंधित सर्वात जास्त पेशंट रोगी  हे भारतात आढळून आलेले आहेत. Heart attack  हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूची वार्षिक संख्या २.२६ दशलक्ष एवढी १९९० मध्ये होती की जी आता दुपटीपेक्षा जास्तीने  वाढलेली आहे 2020 मध्ये हाच आकडा ४.७७ दशलक्ष एवढा झालेला आहे.

 Heart Attack हार्ट अटॅक 2024

अमेरिका तसेच युरोपियन देशाच्या तुलनेमध्ये भारतात  हृदयरोगाला तरुण हे लवकर बळी पडत आहे. हे आपल्या देशासाठी नक्कीच खूप मोठी चिंतेची बाब आहे. मित्रांनो आपल्या लहानपणी आपल्या गावामध्ये क्वचितच एखाद्या व्यक्तीला हृदयरोगाचा झटका येत असे परंतु आता सध्याची परिस्थिती बघितली असता आपल्या प्रत्येकाच्या मित्रमंडळींमध्ये म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये म्हणा कमीत कमी एक ते दोन लोक हृदयरोगी असल्याचे दिसून येत आहे. Covid १९  नंतर हृदय  रोगींच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ ही दिसून आलेली आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांच्या योजनेसाठी येथे दाबा

Heart Attack हृदय रोगाची कारणे कोणती

  • आधुनिक आणि पाश्चात्य जीवनशैली जगणाऱ्या तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटका येण्याचे प्रमाण जास्त असते
  • जेवणातील अन्नपदार्थ चुकीचे निवडणे उदाहरणार्थ जास्त प्रमाणात फास्ट फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेय घेणे ज्यामुळे लठ्ठपणा कोलेस्ट्रॉल आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो.
  • शारीरिक हालचालींचा अभाव थोडक्यात व्यायाम न करणे शरीर कसरत कमी होणे बैठी जीवनशैली जास्त प्रमाणात असणे यामुळे सुद्धा करणारी हृदयरोगाच्या समस्या वाढत आहेत.
  • तंबाखूचा मोठ्या प्रमाणात वापर धूम्रपान आणि धूम्रपान रहित तंबाखूच्या सवयीमुळे सुद्धा हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • तणाव आणि चिंता अनेकदा काम करत असताना आपल्या कामा संबंधित किंवा जीवनशैली संबंधित उच्च प्रमाणात ताण तणाव असल्यामुळे चिंता असल्यामुळे हृदयाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे .
  • हृदयविकाराच्या कौटुंबिक इतिहास असणे (Family History)
  • मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये जेव्हा शरीरात पुरेसे इन्शुलिन तयार होत नाही किंवा त्याचा योग्य वापर शरीर करू शकत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते साखरेच्या टप्पा वाढल्याने हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता वाढते.
  • उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा हृदयविकाराची शक्यता जास्त असते.

Heart Attack हृदय रोगाची लक्षणे कोणती?

  • छातीच्या मध्यभागी वजन वाटणे किंवा दुखणे .
  • डाव्या हातात दुखणे त्याचबरोबर जबड्यात दुखणे.
  • पोटाच्या वरील भागात दुखणे पाठीत दुखणे .
  • छातीत जळजळ होऊन घाम येणे घाबरल्यासारखे वाटणे .
  • थोडे दूर अंतर चालल्यावर दम लागणे.
  • जेव्हा मळमळ किंवा उलट्या होण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नसते त्यावेळेस हा हृदयविकाराचा एक सूक्ष्म संकेत असू शकतो.
  • कोणत्याही शारीरिक कष्टाशिवाय किंवा मानसिक तणावाशिवाय जर अनपेक्षित पणे थंड घाम येत असेल तर हे सुद्धा हृदयविकाराचे सूक्ष्मलक्षण असू शकते

काही वेळेस विशेषता मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कुठलेही विशेष लक्ष न येता हार्ट अटॅक येऊ शकतो. वरील पैकी कुठलेही लक्षण असल्यास त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेणे योग्य आहे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने इसीजी करून हार्ट अटॅकचे प्राथमिक निदान शक्य होते.

Heart Attack हार्ट अटॅक येणे म्हणजे काय नेमकं काय ?

हार्ट अटॅक म्हणजे आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीं  मध्ये अचानकपणे रक्ताची गाठ होऊन हृदयाला रक्तपुरवठा खंडित होणे.

Heart Attack हार्ट अटॅक वरती उपचार

हार्ट अटॅक असल्यास डॉक्टर आपणास दोन प्रकारे उपचार सुचवतात हार्ट अटॅक मध्ये देण्यात येणारे रक्ताच्या गाठी विरघळण्याचे औषध इंजेक्शन रूपात देणे किंवा प्रायमरी एन्जोप्लास्टी करणे म्हणजेच सरळ एन्जोप्लास्टी करून रक्ताच्या गाठी काढून घेणे.  प्रायमरी एन्जो प्लास्टिक हा हार्ट अटॅक साठी सर्वात उत्तम पर्याय मानला गेला आहे एनजीओप्लास्टी म्हणजेच ऑपरेशन न करता स्टॅन्ड टाकून रक्तवाहिनीतील अडथळा दूर करणे एक किंवा दोन ब्लॉक मध्ये हे सहज शक्य असते व ते लगेच करता येते आणि दुसरा म्हणजे जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त ब्लॉकेज असतील  तर डॉक्टर आपणास बायपास ऑपरेशन करण्याचा सल्ला देऊ शकता.

Heart Attack हृदयरोग टाळण्यासाठी ची उपाय योजना

  • निरोगी आहार जर आपण संतृप्त आणि ट्रान्सफॅट सोडियम किंवा साखर कमी असलेला संतुलित आहार घ्या.
  • आपले वजन नियंत्रणात ठेवा हृदयावरील ताण कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी नियंत्रणामध्ये राखा.
  • नियमित व्यायाम करा नियमित शारीरिक हालचालींमुळे आपले कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच हृदयाची स्थिती आणि रक्ताभिसरण सुधरून रक्तदाब हा सामान्य राहण्यास मदत होते .
  • धूम्रपान सोडा धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या जाड होण्याचे प्रमाण लक्षणेरीत्या वाढते तंबाखूचा वापर सोडून दिल्याने हृदय विकाराचा धोका कमी होतो आणि एकूणच आरोग्य सुधारते.
  • अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा. कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात
  • तान तणाव व्यवस्थापन तुम्ही ध्यानाद्वारे किंवा योग साधनेद्वारे किंवा दीर्घ श्वसनाद्वारे ताण तणाव कमी करण्याचा तंत्राचा सराव करू शकता.
  • प्रत्येकाने पुरेशी आणि दर्जेदार झोप घेणे आवश्यक आहे कारण अपुरी झोप हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
  • रक्तदाब नियंत्रित ठेवणे जास्त चरबी असलेला आहार न घेणे नियमित व्यायाम करून आवश्यक असल्यास रक्तदाबाची औषधे वापरून तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकतात.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

Leave a Comment