Job In Germany आता तुम्हालाही परदेशात नोकरी करण्याची संधी (जर्मनी )

वाचक मित्रांनो ,

Job in Germany आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये महाराष्ट्रीयन तरुणाला  जर्मनीमध्ये नोकरीसाठी उपलब्ध असणाऱ्या  संधी विषय जाणून घेणार आहोत. सध्याचे युग हे अतिशय जलद गतीने बदलत आहे. सध्या डिजिटायझेशनचे प्रमाण सगळीकडे वाढत आहे . इंटरनेटचा सगळ्यात जास्त वापर करणाऱ्या देशांमध्ये संपुर्ण जगात भारताचा आता चीन नंतर दुसरा नंबर आहे. आजच्या घडीला आपल्या देशात प्रत्येक परिवारामध्ये कमीत कमी एक अँड्रॉइड फोन आपल्याला नक्कीच आढळून येतो.

मोबाईल आणि इंटरनेट मुळे संपूर्ण जग आता एकदम जवळ आलेले आहे आजच्या घडीला आपण आपल्या घरी बसून जगाचा कानाकोपऱ्यात कुठेही राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी मित्रमंडळीची एक मिनिटात  संपर्क साधू शकतो मोबाईल आणि इंटरनेट मुळे जणू एक नवीन डिजिटल क्रांती झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.  त्याच बरोबर विमानसेवा, दळणवळण सेवा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याकारणाने जग हे जवळ येत आहे अशा वातावरणात आता मराठी तरुणांनी सुद्धा उंच भरारी घ्यायला काहीच हरकत नाही. Job in Germany

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याविषयी माहिती येथे बघा

 Job in Germany जर्मनीत नोकरीची संधी २०२४

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामही श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी नुकत्याच एका कार्यक्रमांमध्ये जाहीर केले की महाराष्ट्राचा युवकाला जर्मनीमध्ये सुद्धा रोजगार मिळायला हवा यासाठी महाराष्ट्र शासनाचा जर्मनीतील बाडेन- युटेनबर्ग या राज्या सोबत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामांजस्य करार करण्यात आलेला आहे.त्याद्वारे आता आपल्या महाराष्ट्रातील  १०,००० कौशल्यपूर्ण युवकांना जर्मनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. Job in Germany

आपणा सगळ्यांना माहितीच आहे की युरोपियन देश औद्योगिक दृष्टीने खूप समृद्ध आहेत  मात्र मागील  काही वर्षांपासून या देशांना कौशल्यपूर्ण कामगारांची कमतरता भासत आहे आणि आता ती उणीव भरून काढण्याचे महाराष्ट्रातील युवकांना चांगली संधी आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 30 वेगवेगळ्या तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या युवकांना जर्मनीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

युरोपियन देशांमध्ये काम करत असताना आपल्याला पगार हा डॉलरमध्ये दिला जातो त्यामुळे त्याचे मूल्य भारतीय चलनात त्याची किंमत खूप मोठी असते जसे तुम्हाला माहितीच आहे सध्याच्या परिस्थितीत एक अमेरिकन डॉलरची किंमत भारताच्या 83 रुपयाच्या बरोबर आहे जर तुम्हाला जर्मनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्या ठिकाणी आपणास तीन हजार पासून साडेतीन हजार डॉलर प्रति महिना  पगार मिळू शकतो तीन हजार डॉलरचे भारतीय चलनामध्ये रुपये २ लाख ५० हजार एवढी होते म्हणजेच तुम्ही दर महिन्याला अडीच लाख रुपये पेक्षा जास्त परदेशात जर्मनीमध्ये जाऊन कमवू  शकतात त्याप्रमाणे जर हिशोब केला तर वर्षाला 30 लाख रुपयांपेक्षा जास्त तुम्ही पगार कमवू शकतात

खालील 30 प्रकल्पात कुशल मनुष्यबळ लागणार आहे

महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच जाहीर केलेल्या जीआर नुसार राज्य सरकार परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंत सहाय्यक, लेखा आणि प्रशासन, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, घरकाम करणारे, इलेक्ट्रीशियन, अक्षय ऊर्जा, हीटिंग तंत्रज्ञ, चित्रकार, अशा विशेष लोकांना लक्ष्य करत आहे. सुतार, प्लंबर, वाहन दुरुस्तीसाठी मेकॅनिक, ड्रायव्हर्स (बस, ट्राम, ट्रेन, ट्रक), सुरक्षा, डिलिव्हरी, पॅकर आणि मूव्हर्स, विमानतळावरील सपोर्ट, क्लीनर, हाउसकीपिंग, विक्री सहाय्य आणि इतर.

 Job in Germany शासनाचे सहकार्य

Job in Germany या योजनेच्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय जिल्हास्तरीय समिती आणि शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय राज्यस्तरीय समिती नेमली आहे. सरकारने प्रशिक्षणाची देखरेख करणारी एक तांत्रिक समिती देखील नियुक्त केली आहे ज्यात वैद्यकीय शिक्षण, वाहतूक, कामगार आणि कौशल्य विकास आयुक्त, तंत्रशिक्षण संचालक यांचा समावेश आहे.

ज्या कुशल युवकांची निवड होईल त्या सर्व युवकांचा पासपोर्ट चा खर्च व्हिसा चा खर्च हा महाराष्ट्र सरकार करणार असून त्या सर्वांना जर्मन भाषा शिकण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासन प्रशिक्षित करणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास ७६ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत.

Job in Germany जर्मन भाषा कोण शिकवणार

या व्यतिरिक्त, विद्यार्थी जर्मन भाषा शिकण्याचे चार स्तर: A1, A2, B1 आणि B2 पूर्ण करतील याची खात्री करण्यासाठी सरकार सुमारे ₹ ३६ कोटी गुंतवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे 200 ठिकाणी जर्मन भाषा शिकवण्यासाठी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. जर्मनीमध्ये संबंधित विद्यार्थ्याला रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, कोणत्या कंपनीमध्ये त्याला काम करायचे आहे त्या कंपनीशी टायप करून देण्यासाठी  भारताचे शासकीय दूतावास  त्या ठिकाणी मदत उपलब्ध करून देणार आहे.

Job in Germany अर्ज करण्याची पद्धती

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

आमच्या पुढील लेखात आम्ही या ठिकाणी अर्ज कसा करायचा याविषयीची माहिती लवकरच प्रसारित करू.जर आपल्या परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये गावांमध्ये तुम्हाला कुशल युवक आढळून आले असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा जेणेकरून ते या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकतात.

2 thoughts on “Job In Germany आता तुम्हालाही परदेशात नोकरी करण्याची संधी (जर्मनी )”

Leave a Comment