Kapus Kid कापूस किड नियंत्रण

शेतकरी बंधूंनो नमस्कार,

 संपूर्ण महाराष्ट्रात कापूस Kapus पिकाची लागवड जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झालेली आहे .आपणा सर्वांना माहिती आहे की कापूस हे पीक महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे . गेल्या वर्षी कापूस पिकाला अपेक्षेप्रमाणे दर मिळाला नाही त्याचबरोबर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्या कारणाने अपेक्षित उत्पादन सुद्धा मिळाले नाही.

अशा परिस्थितीत कापूस पिकाची मशागत जर आपण कमीत कमी खर्चामध्ये केली व आपला उत्पादन खर्च  कमी केला तर आपण आपला नफा नक्कीच वाढवू शकतो. कापूस Kapus पिकात जर आपण योग्य त्या कीटकनाशकांची आवश्यकतेप्रमाणे फवारणी केली तर नक्कीच आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या खरीप हंगामातील एकूण क्षेत्र हे ७०४ लाख हेक्टर च्या पुढे गेले आहे की जे गेल्या वर्षीच्या हंगामात नोंदवलेल्या ६८० लाख हेक्टरच्या तुलनेने लक्षणीय  अधिक आहे. परंतु कापूस पिकाच्या लागवडी क्षेत्रामध्ये थोड्या प्रमाणात घट झालेली यंदा दिसून येत आहे.

Kapus Kid कापूस किड नियंत्रण : 2024

कापूस Kapus पिकात सुरुवातीच्या वाढीच्या काळात रस शोषक किडी उदाहरणार्थ हिरवे तुडतुडे, थ्रिप्स किंवा फुल किडे यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

हिरवे तुडतुडे (Jassids)-:

  • नावाप्रमाणे यांचा रंग हिरवा असतो पूर्णतः वाढलेले तुडतुडे यांचा पंखाच्या शेवटच्या भागाला आपल्याला दोन  काळे  ठिपके दिसून येतात. हिरव्या तुडतुड्यांची पिल्ले हे पानाच्या खालच्या किंवा वरच्या भागावर आपल्याला दिसून येतात व ती चालताना तिरकस चालतात.
  • हिरव्या तूतड्यांची पिल्ले आणि वयस्क दोन्हीही पानाच्या खालच्या बाजूला राहून तीव्रतेने पानांच्या रस शोषण्याचे काम करतात. सुरुवातीला पाने पिवळी पडतात ,त्यामुळे पानांच्या कडा या खालच्या बाजूला वाकायला लागतात आणि जर जास्त प्रादुर्भाव असेल तर पाने कडेला लालसर रंगाची होऊन शेवटी गळून पडतात त्यामुळे कापूस पिकाच्या झाडाची वाढ खुंटते.
  • जर आपल्याला एका पानावरती एक ते दोन पिल्ले (Nymphs)किंवा वयस्क (Adult) दिसून आले तर हिरव्या तुडतुड्यांची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली आहे असे समजावे.
  • ढगाळ हवामान आणि पावसाच्या असमान रिमझिम सरींमुळे हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाडीस चालना मिळते हिरव्या तुडतुड्यांसाठी पोषक वातावरण तयार होते.
  • साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत  आपल्याला हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शेतात दिसून येतो.
  • उशिरा केलेल्या लागवडीमुळे आणि नत्रयुक्त खतांचा जास्त वापर केल्यामुळे सुद्धा हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

पूरस्थितीचा धोक्याचा इशारा कसा ओळखाल हे जाणून घेण्यासाठी कृपया येथे दाबा

हिरवे तुडतुडे नियंत्रण-:

  • पहिली फवारणी ही निम आधारित कीटकनाशक पाच एम एल प्रति लिटर याप्रमाणे १५ लिटर साठी ७५ मिली घेऊन करू शकतात. या मिश्रणात १५ ग्रॅम कपडे धुण्याची पावडर सुद्धा तुम्ही ऍड करू शकतात मिक्स करू शकतात
  • दुसरी फवारणी कॉन्फिडोर पाच ते सहा मिलिलीटर १५ लिटर साठी ह्या प्रमाणामध्ये घेऊ शकतो किंवा उलाला (UPL)सहा ग्रॅम किंवा रेन किल (Bayer) आठ ग्राम  प्रति १५ लिटर याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता.
  • दुसरी फवारणी घेत असताना १९:१९:१९ किंवा १२:६१:०० ते ६० ते ७० ग्राम प्रति पंप मिसळू शकतात.
  • तिसऱ्या फवारणीच्या वेळेस तुम्ही पोलीस ५ ग्राम  किंवा ऑक्सालीस १५ ग्रॅम प्रति १५ लिटर या प्रमाणात घेऊ शकता
  • एकच केमिकल हे पुन्हा पुन्हा रिपीट करायचे नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

फुल किडे (Thrips):-

  • फुलकिडे हे फिकट पिवळ्या रंगाचे असतात आकाराने अतिशय लहान असल्यामुळे सहजासहजी ते आपल्याला दिसत नाही तरी पण जर आपण जाड भिंगाचा उपयोग केला तर पानाच्या मागच्या बाजूला दोन शिरांच्या मध्ये आपल्याला यांचे अस्तित्व सहज दिसू शकते
  • फुलकिडींचे पिल्ले आणि प्रौढ पानाच्या मागच्या बाजू मधील शिरांच्या मधल्या भागातील पापुद्रा खरडून काढतात
  • पानांच्या कडा वरच्या बाजूला वळायला लागतात पानाच्या मागच्या बाजूला पानांच्या मागच्या बाजूला चंदेरी रंगाचे डाग दिसून येतात
  • जर फुलकिडींचे प्रमाण जास्त असेल तर आपल्याला दोन शिरांच्या मध्ये पाने ही फाटलेली दिसून येतात.
  • यामुळे झाडाची वाढ खुंटते खुंटते व आपल्याला अपेक्षित असलेले उत्पादन मिळत नाही.
  • जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो त्यावेळेस फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होते.
  • एका पानावर दहा थ्रिप्स आढळून आले असल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली गेली आहे असे समजावे

फुल किडे (Thrips) नियंत्रण-:

  • ऍक्टरा ५ ग्राम किंवा प्रोफेनोफोस २५ ते ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
  • जर फुल किड्यांचे प्रमाण कमी असेल तर हिरव्या तुडतुड्यांसाठी आपण जी फवारणी करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला फुलकिड्यांसाठी चांगल्यापैकी नियंत्रण मिळू शकते कमी प्रमाणासाठी वेगळी फवारणी करण्याची आवश्यकता नाही.
  • जर फुल किडे जास्त प्रमाणात असतील तर डेलिगेट १५ मिली  किंवा ऑक्सालीस १५ ग्रॅम  किंवा पोलीस ५ ग्राम प्रति १५ लिटर या प्रमाणात फवारणी करू शकतात.
  • जर फुल किडे जास्त प्रमाणात असतील बायो 303 (दमन) चा १५ मिली प्रति १५ लिटर या प्रमाणात फवारणी करू शकतात.
  • कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य तो प्रकारे स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे

कापूस हे पीक दीर्घ कालावधीचे असल्याकारणाने सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कापूस पिकाची वाढ ही मंद गतीने होत असते त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाचे रस शोषणाऱ्या किडीपासून संरक्षण करणे खूप महत्त्वाचे असते.

वरील औषधांची फवारणी करण्यापूर्वी आपल्या भागातील कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.त्याचबरोबर.कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी नेहमी लेबल दिशानिर्देश वाचा आणि त्यांचे अनुसरण करा.

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुढील सोमवारी आपण कापूस पिकातील पांढरी माशी आणि गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण याविषयी माहिती जाणून घेऊ

1 thought on “Kapus Kid कापूस किड नियंत्रण”

Leave a Comment