वाचक बंधू आणि भगिनींना नमस्कार!
Ladaki Bahin Yojana आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विषयीची एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की ज्या पात्र महिलांनी जुलै महिन्यापर्यंत फॉर्म भरले होते त्यांचे पैसे हे ऑगस्ट महिन्यामध्ये मिळाले त्याचबरोबर ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्या महिलांना दिनांक ३० सप्टेंबर पासून मागील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिने मिळून रुपये साडेचार हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्टाच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
Ladaki Bahin Yojana ज्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील त्यांनी खालील गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
- आपले आधार कार्ड वरचे नाव आणि बँक पासबुक वरचे नाव हे एकच असणे आवश्यक आहे जर त्यामध्ये तफावत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत.
- तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे जर ते जोडलेले नसेल तर तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत.
- जर तुम्ही काढलेले बँक खाते इन ऍक्टिव्ह झालेले असेल तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पैसे जमा होणार नाही.
- जर तुमच्या बँक खाते मध्ये पैसे जमा होण्यास अडचण येत असेल तर तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा नवीन अकाउंट खाते उघडू शकतात.
हृदयरोग हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे येथे दाबा
Ladaki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट २०२४
- महाराष्ट्र राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिलांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांचे व मुलींचे सशक्ति करण्यास चालना देणे.
- राज्यातील महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे स्वरूप
- प्रत्येक पात्र महिला महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी )द्वारे प्रत्येक महिन्याला रुपये १५००/- इतकी रक्कम दिली जाईल.
Ladaki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
- महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता
Ladaki Bahin Yojana लाडकी बहीण योजना ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी परळी वैजनाथ येथील सभेमध्ये सांगितले की लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे १० ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात जमा होतील. त्याचबरोबर डिसेंबर पासून चे पुढचे नऊ महिन्यांसाठी लागणारे ३५००० करोड रुपयांची तरतूद सुद्धा आम्ही आधीच करून ठेवलेली आहे. असे सुद्धा त्यांनी काल बारामती येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये सांगितले .महाराष्ट्र सरकार देत असलेले पैसे सर्व महिलांनी स्वतःसाठी वापरावे आणि सन्मानाने राहावे यासाठी योजना आणलेली आहे असेही त्यांनी पुढे नमूद केले महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे असे इथे पुढे म्हणाले.
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड (अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे )
- अधिवास प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक.
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक आवश्यक
- वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक.
- पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्ड वर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
- बँक खाते तपशील बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक.
- लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!