Lakhpati didi yojana आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये लखपती दीदी योजना विषयी जाणून घेणार आहोत आपल्या देशाची १४० कोटी लोकसंख्येमध्ये साधारण ५० टक्के प्रमाण हे महिलांचे आहे. आपणा सगळ्यांना माहितीच आहे की भारत हा देश पुरुषप्रधान संस्कृतीचा संस्कृतीचा देश आहे. आपल्या जुन्या संस्कृतीनुसार पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमवायचे आणि स्त्रियांनी घर सांभाळायचं अशी पद्धत होती.
आता जग बदलत चाललंय आणि या बदलत्या जगासोबत आपल्याला सुद्धा थोडे बदलायला लागेल. म्हणतात ना एक शिकलेली आई संपूर्ण घराला पुढे नेई. त्याचप्रमाणे जर आपल्या घरातील महिला या आर्थिक दृष्ट्या स्वालंबी झाल्या तर नक्कीच त्या आपल्या घराला, कुटुंबाला आपल्या गावाला त्याच बरोबर आपल्या देशाला सुद्धा खूप पुढे नेऊ शकतात.आज आपल्या देशात सुद्धा महिला सक्षमीकरणाची खूप आवश्यकता आहे महिलांना सुद्धा पुरुषांप्रमाणे समान हक्क, संधी आणि संसाधने उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे
आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये ५०% लोकसंख्येचे प्रमाण असलेली महिला शक्ती, नारी शक्ती ही सुद्धा चांगल्या प्रकारे योगदान करू शकते आणि म्हणूनच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून लखपती दीदी ही योजना सुरू केली केलेली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आपल्या देशातील तीन कोटी Lakhpati didi yojana महिलांना लखपती बनविणे आहे.
योजना नेमकी काय आहे? तसेच तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो कोठे करायचा ? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? त्यासाठी कोण अर्ज करू शकतो? याविषयी संपूर्ण माहिती खालील लेखात दिलेली आहे.
Lakhpati didi yojana लखपती दीदी योजना २०२४ मुख्य उद्देश
लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने देशातील तीन कोटी हून अधिक महिलानां लखपती बनण्यासाठी सहकार्य करण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू केलेला आहे. लखपती दीदी चा मुख्य उद्देश लखपती दीदींनी वार्षिक किमान एक लाख रुपयांचे स्थिर उत्पन्न मिळविणे हा होय.
यासाठी प्रत्येक दीदीला कृषी संलग्न किंवा इतर उद्योगासाठी सहकार्य केले जाईल ज्याद्वारे ते एक नवीन उद्योग उभारू शकतील यासाठी लागणारे संपूर्ण सहकार्य या योजनेद्वारे त्यांना करण्यात येईल. ज्यामध्ये प्रत्येक दीदीला किमान तीन ते चार प्रकारच्या उपजीविका क्रियाकलापांसाठी, विशेषत: शेतीबरोबरच शेती नसलेल्या क्रियाकलापांसाठी सक्षम केले जाईल.
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रण विषयी माहिती साठी यथे दाबा
देशातील महिलांना स्वावलंबी बनून उपजीविकेचे साधन प्रदान करण्यासाठी रुपये पाच लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा सुद्धा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
Lakhpati didi yojana लखपती दीदी योजना अंतर्गत लखपती दीदींनी बनवलेल्या उत्पादनांना जागतिक मूल्य साखळीशी जोडले जाईल आणि आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातील बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यासाठी सहकार्य केले जाईल. यासोबतच तांत्रिक आणि आर्थिक संसाधने गोळा करण्यासाठी लखपती दीदींना 20 पेक्षा जास्त मंत्रालये आणि संस्थांच्या योजनांशी जोडले जाईल.
Lakhpati Didi Yojana लखपती दीदी योजनेसाठीची पात्रता
- अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी.
- अर्जदार महिलेची वय किमान १८वर्षे आणि कमाल ५० वर्षे असावी.
- लखपती दीदी योजनेचा लाभ स्वयंसहायता गटात काम करणाऱ्या महिलांना मिळेल.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य शासकीय पदावर कार्यरत नसावेत.
लखपती दीदी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- निवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- बँक खाते
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाइल नंबर
lakhpati didi yojana लखपती दीदी साठी अर्ज कसा भरणार
केंद्र सरकारने योजनेची अधिकृत वेबसाइट जारी केली आहे जिथे अर्जदार महिलांना योजनेची संपूर्ण माहिती मिळू शकते. लखपती दीदी योजना च्या अधिकृत वेबसाइटवर https://lakhpatididi.gov.in/ इतर महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा मिळू शकते
Lakhpati Didi Yojana ऑफलाइन अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास कार्यालयामध्ये जायचे आहे.
- या कार्यालयात जाऊन लखपती दीदी योजना फॉर्म प्राप्त करावा लागेल.
- अर्ज फॉर्म मिळवल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये आवश्यक माहिती नोंदवावी लागेल.
- अर्जामध्ये माहिती नोंदवल्यानंतर वर दिलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
- आता अर्ज महिला आणि बाल विकास विभाग कार्यालयात जमा करावा लागेल.
- अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला पावती दिली जाईल, ती सांभाळून ठेवावी.
- अर्ज केल्यानंतर लाभार्थी महिलांची सूची जाहीर केली जाईल. योजनेअंतर्गत पात्र महिलांनी अधिकृत वेबसाइटवर आपले नाव तपासू शकतात.
- याशिवाय, लखपती दीदी योजना सूची बँक, महिलाआणि बाल विकास विभाग कार्यालय, ग्रामपंचायत येथे देखील जाहीर केली जाईल.