वाचक मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार !
आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मुलींसाठी असणाऱ्या असणारी एक महत्त्वाची योजनेविषयी Lek ladaki Yojana जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला सांगावेसे वाटते की आपल्या भारतामध्ये मुलींचा जन्मदर हा ९८५ इतका आहे म्हणजेच दर हजार मुलांना मागे ९८५ मुली जन्माला येत आहेत याचाच अर्थ असा की मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे पालकांची मुलींच्या जन्माविषयी असलेली चुकीची धारणा. मुलगी म्हणजे आई-वडिलांसाठी ओझे असते मुलगी म्हटलं की खर्च हा येणारच अशा काही समजूतीमुळे मुलींचा जन्मदर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. Lek ladaki yojana
मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही नवीन योजना लागू केली होती. परंतु सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन मुलींच्या सक्षमीकरणाकरता नवीन योजना लागू करण्याचे शासनाने ठरवले त्या अनुषंगाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये मुलींच्या सक्षमी करण्यासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Lek Ladaki Yojana 2024
पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये लेक लाडकी योजने विषयी जाणून घेणार आहोत.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!
लेक लाडकी योजना २०२४ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या १८ वर्षे वायापर्यंत एकूण १,०१,००० रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे मुलींच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Lek Ladaki Yojana लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्दिष्टे :
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींच्या जन्मदर वाढविणे.
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
- मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह चे प्रमाण रोखणे .
- कुपोषण कमी करणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
Lek Ladaki Yojana लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती :
- ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांमध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील त्याचबरोबर एक मुलगा व एक मुलगी असल्यास सुद्धा ही योजना लागू राहील.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता/ पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेच्या लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता/ पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी अथवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्ररित्या ही योजना अनुज्ञय राहील मात्र माता / पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील .
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी चे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लाखापेक्षा जास्त नसावे.
पीएम विद्या लक्ष्मी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
Lek Ladaki yojana आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थीचा जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे) याबाबत तहसीलदार अथवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- लाभार्थीच्या आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शीतील राहील.
- पालकांच्या आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- रेशन कार्ड मिळविण्यात पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत
- मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभ करता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र
Lek Ladaki Yojana योजनेचा लाभ :
- या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये
- इयेत्या पहिली ६ हजार रुपये
- इयेत्या सहावीत ७००० हजार रुपये आणि
- अकरावीत ८ हजार रुपये
- तर लाभार्थीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल.
Lek Ladaki Yojana अर्ज करण्याची पद्धत :
आपल्या भागातील जवळच्या अंगणवाडी सेविका केंद्रात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.लेक लाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका/ संबंधित पर्वेक्षिका /मुख्य सेविका यांची राहील .अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षिका/ मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांना यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेला आहेत.