शेतकरी बंधूंनो नमस्कार,
Magel Tyala Solar Krushi Pump आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये एका खूप महत्त्वाच्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजनेविषयी जाणून घेणार आहोत आणि ती म्हणजे महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.
वाचक मित्रांनो मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील जो आपला बळीराजा आहे त्याला अन्न पिकवण्यासाठी शेतात जो वीज पुरवठा केला जातो तो नेहमी रात्री ६ ते ८ तासांसाठी केलेला असतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी शेतात जे पीक पेरले ते जगविण्यासाठी रात्रभर शेतात राबून पाणी द्यावे लागते.
मित्रांनो कल्पना करा की हिवाळ्यात एखाद्या रात्री तुम्ही शेतात आहात आणि त्या कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्हाला पिकाला पाणी द्यायचे आहे आपण रात्रभर एक रात्रभर जी गोष्ट करू शकत नाही ती गोष्ट शेतकरी बांधवांना नेहमीच प्रत्येक रात्री शेतात जाऊन आपल्या सर्वांचे पोट भरण्यासाठी करायची आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी येथे दाबा
आपल्या देशातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामान हे खूप तीव्र गतीने बदलत आहे आणि याचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागत आहे खास करून या अनियमित पावसामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झालेला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवलेली दिसत आहे .
Magel Tyala Solar Krushi Pump मागेल त्याला सौर कृषी पंप २०२४
राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक २८ जून २०२४ रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली.
Magel Tyala Solar Krushi Pump योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
- शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय करण्यासाठी स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरून सौर पॅनेल आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळेल.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% आहे..
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनुदानित आहे.
- जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP क्षमतेचे पंप
- विम्यासह पाच वर्षांची दुरुस्ती हमी
- वीज बिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही.
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
Magel Tyala Solar Krushi Pump लाभार्थी निवडीचे निकष
- २.५ एकर पर्यंतचे शेत जमीन असलेल्या शेतकरी बंधूंना ३ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप मिळू शकतील.
- २.५१ एकर पासून ५ एकर क्षेत्र असलेल्या शेतकरी बंधूंना ५ एचपी क्षमतेचे सोलर कृषी पंप मिळतील
- आणि ५ एकर पेक्षा जास्त शेत जमीन धारण करणाऱ्या शेतकरी बंधूंना ७.५ एचपी क्षमतेचे सोलर पंप दिले जाते जातील
- त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी पात्र क्षमतेच्या सौर कृषी पंप ऐवजी कमी क्षमतेचा सौर कृषी पंपाची मागणी केल्यास ती मागणी सुद्धा मंजूर करण्यात येईल.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेत तलाव, विहिरी, बोअरवेलचे मालक आणि बारमाही नद्या/नाल्यांच्या शेजारी शेतजमीन धारण करणारे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र असतील.
- ज्या शेतकऱ्यांनी बोअरवेल, विहीर, नदी इ.मधील पाण्याचे स्त्रोत सुनिश्चित केले आहेत ते महावितरण खात्री करेल. तथापि, जलसंधारणाच्या कामांच्या जलसाठ्यांमधून पाणी काढण्यासाठी या पंपांचा वापर करता येणार नाही.
- ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही, ते देखील या अभियानांतर्गत लाभासाठी पात्र असतील.
Magel Tyala Solar Krushi Pump योजनेचा कालावधी
- सौर कृषी पंप योजना पाच वर्षासाठी एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत शासन निर्णय घेण्यात येईल.
- सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे .
- आवश्यकतेनुसार महावितरण कंपनीने सदर योजना राबविण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनात नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा .
- अशा पद्धतीचा निर्णय सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक ११ जुलै २०२४ रोजी च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- शेत जमिनीच्या सातबाराचा उतारा ज्यामध्ये विहीर किंवा बोरवेल चा उल्लेख केलेला आहे.
- जर जमीन एका व्यक्ती पेक्षा जास्त लोकांच्या नावावर असेल तर रुपये 200 च्या स्टॅम्प पेपरवर ना हरकत प्रमाणपत्र लिहून देणे
- आधार कार्डची झेरॉक्स
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटोग्राफ
अर्ज करण्याची पद्धती
- मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात .