Monthly SIP दरमहा एक हजार रुपयाची गुंतवणूक करून बना करोडपती

वाचक मित्रांनो ,

सध्या जग प्रचंड वेगाने बदलत आहे आपण सर्वजण त्या बदलाचा अनुभव घेत आहोत. तंत्रज्ञानाने आपले सर्व जीवन व्यापून टाकलेले आहे. घरात प्रत्येकाकडे मोबाईल सेट सुद्धा आहे त्याने आपण संपूर्ण जगाशी जोडले गेलेलो आहोत हे याआधी कधीही शक्य नव्हते. इंटरनेट आणि सोशल मीडिया याच्यामुळे संपूर्ण जग आता जवळ आलेले आहे.आज आपण Monthly SIP मंथली सिप गुंतवणुकीचे फायदे बघणार आहोत

जग जसे बदलत आहे तसा भारतही बदलतोय. सध्या आपला समावेश जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि पुढील पाच वर्षांमध्ये आपण जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये राहू असा सर्वांना विश्वास आहे. आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी योग्य ठिकाणी Monthly SIP योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे

Monthly SIP

आज आपण आपल्या धन की बात या सदरामध्ये  पैशांची गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल याविषयी माहिती बघणार आहोत. जर आपल्याला खरोखर श्रीमंत व्हायचं असेल, करोडपती व्हायचं असेल तर फक्त मेहनत करून,काबाडकष्ट करून आपण होऊ शकू असे मला तरी वाटत नाही. कारण जर तसे राहिले असते तर सगळ्यात जास्त अंग मेहनत करणारे लोक अधिक श्रीमंत व्हायला पाहिजे होते पण आपल्या समाजात सध्या तरी तसे दिसत नाही आणि इथून पुढे तसं दिसेल याची सुद्धा सुतराम शक्यता नाही.

तुम्ही कष्टाने कमावलेल्या पैशाला जर योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास यशस्वी ठरले तर भविष्यात तुमची करोडपती बनण्याची शक्यता ही अधिक आहे. असे म्हणतात की  समझ ही योग्य वेळेला ज्याला आली तो त्याच्या आयुष्यात यशस्वी ठरला कारण बऱ्याचदा असे दिसून येते की ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. योग्य वेळेला जर आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकलो (Monthly SIP) तर आपण आपल्या आयुष्यात शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो.

Monthly SIP 2024

आजही आपल्या आजूबाजूला  असे दिसून येते की जर आपणास पैशांची गुंतवणूक करायची असेल तर सर्वप्रथम जमीन, शेती, घर, सोने किंवा एलआयसी पॉलिसी याचाच प्रामुख्याने विचार केला जातो. पूर्वी हे सर्व ठीक होते तेव्हा आपल्याला जास्त पर्याय सहजासहजी उपलब्ध नसायची  परंतु आता एकविसाव्या शतकामध्ये सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपल्याकडे गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत.

 जाणून घ्या बाजरीची भाकर खाण्याचे फायदे   येथे दाबा

गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? हजार रुपये गुंतवणुकीचा फायदा!

सर्वात आधी आपणास गुंतवणूक म्हणजे नेमकं काय ते समजून घ्यायला हवं. गुंतवणूक म्हणजे भविष्यात अधिक पैसे कमावण्याच्या अपेक्षेने आपला पैसा मालमत्तेत किंवा व्यवसायात टाकणे होय. हे करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत जसे की वेगवेगळे स्टॉक्स, बॉण्ड्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी करणे.

आपल्या रिक्स घेण्याच्या क्षमतेनुसार सध्या बाजारात  कमी रिक्स असणारी  गुंतवणूक, मध्यम रिक्स असणारी गुंतवणूक आणि जास्त रिक्स असणारी गुंतवणूक अशी विविध पर्याय  उपलब्ध आहेत. जास्त रिक्स मध्ये तुम्हाला रिवार्ड म्हणजेच बक्षीस सुद्धा जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता असते तेच त्याच्या उलट कमी रिक्स असणाऱ्या गुंतवणुकीमध्ये रिवार्ड हा सुद्धा कमी प्रमाणात मिळायची शक्यता असते.

आता आपण गुंतवणुकीचे पर्याय बघू या

कमी जोखीम असणारी गुंतवणूक:

अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये जोखीम एकदम कमी किंवा शून्य असते. आपल्याला खात्रीशीर उत्पन्न किंवा  फिक्स उत्पन्न मिळणार असते. ज्यांना कमी जोखीम घ्यायची आहे अशा गुंतवणूकदारांसाठी  हा पर्याय उत्कृष्ट समजला जातो. यामध्ये फिक्स डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजना उपलब्ध आहेत.

मध्यम जोखीम असणारी गुंतवणूक:

अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये जोखीम मध्यम प्रमाणामध्ये  असते. ज्या गुंतवणूकदारांना आपला पोर्टफोलिओ हा बॅलेन्स ठेवायचा आहे त्यांनी मध्यम जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीचा पर्यायाचा उपयोग करावा. यामध्ये प्रामुख्याने कार्पोरेट बॉण्ड्स, गव्हर्मेंट बॉण्ड्स डेबीट फंडस् यांचा समावेश होतो

जास्त जोखीम असणारी गुंतवणूक:

ही गुंतवणूक प्रामुख्याने शेअर बाजाराशी निगडित असून यांमध्ये जोखीम ही जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर भविष्यात आपल्याला परतावा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. तरुण गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स म्युच्युअल फंड्स यांचा समावेश होतो.

म्युचल फंड म्हणजे काय?

आता आपण म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमके काय आहे या विषयी थोडक्यात जाणून घेऊया. बऱ्याचदा तुम्ही टीव्ही वरती सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग  धोनी  यांना म्युच्युअल फंड सही है अशा प्रकारची जाहिरात करताना पहिले असेल. म्युच्युअल फंडामध्ये स्टॉक्स, बॉण्ड्स किंवा इतर सिक्युरिटीजचा पोर्टफोलिओ असतो आणि व्यावसायिक फंड मॅनेजरद्वारे त्याची देखरेख केली जाते.

म्युचल फंड विषयी संपूर्ण माहिती आणि सर्व शंकांचे निरसन करणारी भारतातली एकमेव संस्था म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया(AMFI) ही आहे सध्या भारतात ४४ म्युचल फंड्स  हौसेस रजिस्टर आहेत  आणि त्यांच्या अडीच हजारापेक्षा जास्त वेगवेगळ्या म्युच्युअल फंड स्कीम गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे आहेत. गुंतवणूकदार दर महिन्याला कमीत कमी पाचशे रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत म्युचल फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकतो. सध्या आपल्या देशात आठ कोटीहून जास्त म्युच्युअल फंड एस आय पी ची खाती आहेत.म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते

 महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Monthly SIP मंथली एस आय पी ची जादू

जर तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये याप्रमाणे चाळीस वर्षासाठी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केली आणि तुम्हाला कमीत कमी वार्षिक 12.5 टक्के प्रमाणे रिटर्न्स मिळाले तर चाळीस वर्षानंतर तुमच्याकडे एक कोटी पेक्षा जास्त ( 1,12,82,511 ) रक्कम असेल. हे केवळ चक्रवाढ व्याजाच्या शक्तीमुळे शक्य होऊ शकते   महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी पावर ऑफ कंपाऊंडिंग ला  जगातले आठवे आश्चर्य  म्हटले आहे. मंथली एस आय पी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात आणि आम्हाला पर्सनल मेसेज करू शकता किंवा आमच्याशी संपर्क करू शकतात

Leave a Comment