वाचक मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार ,
Mukhamantri Tirth Darshan Yojana आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना नेमकी काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. ३३ कोटी देव असलेल्या आपल्या भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी राहत आहेत. आपले महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत.
आपल्या हिंदू धर्मामध्ये चार धाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा, काशी विश्वनाथ यात्रा, राम जन्मभूमी यात्रा यासारख्या तीर्थक्षेत्रांचे खूप मोठे महत्त्व आहे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आयुष्यात कमीत कमी एकदा तरी या महान धर्म स्थळांना भेट दिली गेली पाहिजे त्यातला त्यात ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आपल्या संसारी जीवनाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या असतात अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मनातली ही एक महत्त्वाची सुप्त इच्छा असते की त्यांनी एकदा तरी या महान तीर्थस्थळांना भेट द्यायला हवी परंतु प्रत्येकालाच ही गोष्ट शक्य होत नाही.
Mukhamantri Tirth darshan Yojana गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अशा ठिकाणांच्या तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळाला जाऊन मनशांती तसेच अध्यात्म पातळी गाठणे सुकर व्हावे .यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत या सर्वांना आपल्या राज्यातील आणि आपल्या देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Mukhamantri Tirth Darshan Yojana मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४
योजनेची व्याप्ती
सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश केलेला राहील. या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती रुपये ३०,००० इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने ची माहिती जाणून घेण्यासाठी येथे दाबा
Mukhamantri Tirth Darshan Yojana योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- वय वर्ष साठ व त्यावरील जेष्ठ नागरिक .
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावी.
योजनेच्या लाभार्थ्याची अपात्रता
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत .
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत .
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार /आमदार आहे .
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत .
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
Mukhamantri Tirth darshan Yojana योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज .
- लाभार्थ्याच्या आधार कार्ड किंवा रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
- सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापर्यंत असणे अनिर्वाय आहे.
- पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो.
- जवळचा नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
Mukhamantri Tirth Darshan Yojana लाभार्थ्याची निवड
- प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल.
- प्रत्येक ठिकाणाच्या प्रवासासाठी जिल्हा निहाय कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकार देऊन कोटा निश्चित केला जाईल.
- विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाचा उपलब्धतेवर आधारित लॉटरी द्वारे लॉटरी संगणकृत ड्रॉ करून प्रवाशांची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल
- निवडलेल्या प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल.
- निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचनाफलाकावर आणि योग्य वाटेल असे इतर माध्यमातून प्रसारित केली जाईल.
- फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रा ला जाऊ शकेल तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणताही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.
प्रधानमंत्री ज्येष्ठ नागरिक विमा योजनेची माहितीसाठी येथे दाबा
अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र जेष्ठ नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात
- ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
- अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल .
- यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र ( रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे