वाचक मित्रांनो ,
आपली प्रत्येकाची प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते की मी आर्थिक दृष्ट्या समृध्द व्हावो. माझ्या परिवाराच्या ज्या काही गरजा आहे त्या मी 100% पूर्ण करण्यासाठी समर्थ असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्याला माहितीच आहे की महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च असो की दवाखान्याचा प्रत्येक ठिकाणी महागाई वाढत चाललेली आहे. Mutual Fund
नवीन घर घ्यायचं असेल फ्लॅट घ्यायचा असेल त्यांचे सुद्धा खूप भाव वाढलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आर्थिक दृष्ट्या स्वालंबी बनणे खूप कठीण झाले आहे, आणि म्हणूनच आज आपण आर्थिक साक्षरता विषयी जाणून घेणार आहोत प्रत्येक जण आर्थिक दृष्ट्या समृध्द कसा होऊ शकतो याबाबतीत आज आपण बघणार आहोत. बेरोजगारीचे प्रमाण ते सुद्धा वाढत चाललेले आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हायचं असेल तर काय करता येईल याबाबतीमध्ये आज आपण विचार करणार आहोत.
Mutual Fund 2024
आपल्या आजूबाजूला असे दिसून येते की जर आपणास पैशांची गुंतवणूक करायची असेल तर सर्वप्रथम जमीन, शेती, घर, सोने किंवा एलआयसी पॉलिसी याचाच प्रामुख्याने विचार केला जातो. पूर्वी हे सर्व ठीक होते तेव्हा आपल्याला जास्त पर्याय सहजासहजी उपलब्ध नसायची परंतु आता एकविसाव्या शतकामध्ये सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपल्याकडे गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत.Mutual Fund बऱ्याच लोकांमध्ये असा गैरसमज आहे आर्थिक गुंतवणूक म्हणजे लाईफ इन्शुरन्स जीवनाची हमी त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घ्यावे लागेल तरच आपण योग्यरीत्या आपल्या मेहनतीच्या कमाईची योग्य गुंतवणूक करून त्यामधून समृध्द होऊ शकतो.
Mutual Fund मित्रहो गुंतवणूक म्हणजे आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यापासून आपल्याला चांगले रिटर्न्स (फायदे) हे मिळायला हवे उदाहरणार्थ महागाई जर १०% टक्क्याने वाढत असेल तर आपण गुंतवणूक केलेल्या पैशाने आपल्याला १०% दहा टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स (फायदे) हे द्यायला पाहिजे तरच आपली गुंतवणूक योग्य आहे असे म्हटले जाईल. याउलट लाइफ इन्शुरन्स मध्ये आपल्या पश्चात आपल्या परिवाराची आर्थिक नियोजनाची सोय करणे म्हणजेच इन्शुरन्स काढणे किंवा जीवन विमा काढणे होय.
लाडका भाऊ योजने विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे दाबा
जर आपल्याला खरोखर श्रीमंत व्हायचं असेल, करोडपती व्हायचं असेल तर फक्त मेहनत करून,काबाडकष्ट करून आपण होऊ शकू असे मला तरी वाटत नाही. कारण जर तसे राहिले असते तर सगळ्यात जास्त अंग मेहनत करणारे लोक अधिक श्रीमंत व्हायला पाहिजे होते पण आपल्या समाजात सध्या तरी तसे दिसत नाही आणि इथून पुढे तसं दिसेल याची सुद्धा सुतराम शक्यता नाही.Mutual Fund Sahi Hai
तुम्ही कष्टाने कमावलेल्या पैशाला जर योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास यशस्वी ठरले तर भविष्यात तुमची करोडपती बनण्याची शक्यता ही अधिक आहे. असे म्हणतात की समझ ही योग्य वेळेला ज्याला आली तो त्याच्या आयुष्यात यशस्वी ठरला कारण बऱ्याचदा असे दिसून येते की ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. योग्य वेळेला जर आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकलो (Monthly SIP) तर आपण आपल्या आयुष्यात शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो.
बऱ्याचदा आपण टीव्ही वरती जाहिरात बघत असतो Mutual Fund म्युचल फंड सही है तर आज आपण जाणून घेणार आहोत म्युचल फंड म्हणजे काय कोणत्या प्रकारचे म्युच्युअल फंड असतात त्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर कशा पद्धतीने करू शकतो जसे म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे तसंच जर रोज दर महिन्याला आपण कमीत कमी हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि ते तर आपल्याला किती परतावा मिळू शकतो.
Mutual Fund म्युचल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदारांच्या एकत्रित भांडवलाने खरेदी केलेले स्टॉक, बाँड किंवा इतर सिक्युरिटीजचा एक पोर्टफोलिओ.म्युचल फंडामध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार हा व्यवसायिक रित्या निरनिराळ्या व्यवस्थापित झालेल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करू शकतो.
म्युच्युअल फंड विषयी संपूर्ण माहिती आणि सर्व शंकांचे निरसन करणारी भारतातली एकमेव संस्था म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया(AMFI) ही आहे. तवणूकदार दर महिन्याला कमीत कमी ५०० रुपयांपासून ते ५००००/-पन्नास हजार रुपयांपर्यंत म्युचल फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकतो. सध्या आपल्या देशात आठ कोटीहून जास्त म्युच्युअल फंड एस आय पी ची खाती आहेत.म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.
म्युच्युअल फंड अनेक प्रकारात येतात, जे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. जसे लार्ज कॅप फंड, मिडकॅप फंड, स्मॉल कॅप फंड, इंडेक्स फंड, बॅलन्स फंड, इक्विटी फंड , हायब्रीड फंड असे अनेक प्रकारचे म्युचल फंड्स आहेत.
Mutual Fund म्युचल फंड कुठून खरेदी करू शकतो
एखादी व्यक्ती आर्थिक मध्यस्थाच्या मदतीने / द्वारे गुंतवणूक करू शकते, म्हणजे, एएमएफआयमध्ये नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरकाद्वारे खरेदी करू शकते किंवा स्वतः डायरेक्ट ऑनलाइन पद्धतीने सुद्धा म्युचल फंड वेबसाईटवर जाऊन थेट गुंतवणूक करणे निवडू शकतो. म्युच्युअल फंड वितरक हा एक वैयक्तिक किंवा गैर-वैयक्तिक घटक असू शकतो, जसे की बँक, ब्रोकिंग हाऊस किंवा ऑन-लाइन वितरण चॅनेल प्रदाता.
Mutual Fund म्युच्युअल फंड मंथली एस आय पी ची जादू
जर तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये याप्रमाणे चाळीस वर्षासाठी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केली आणि तुम्हाला कमीत कमी वार्षिक 12.5 टक्के प्रमाणे रिटर्न्स मिळाले तर चाळीस वर्षानंतर तुमच्याकडे एक कोटी पेक्षा जास्त ( 1,12,82,511 ) रक्कम असेल. हे केवळ चक्रवाढ व्याजाच्या शक्तीमुळे शक्य होऊ शकते महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी पावर ऑफ कंपाऊंडिंग ला जगातले आठवे आश्चर्य म्हटले आहे.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!
आपल्या पुढील भागात आपण म्युच्युअल फंडचे वेगवेगळ्या प्रकारांची माहिती करून घेऊ!