Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना चौथा हप्ता केव्हा मिळेल?

शेतकरी बंधूंनो,

नमस्कार,

आज आपण namo shetkari yojana नमो शेतकरी योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केलेली आहे त्याच धर्तीवर राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे.

namo shetkari yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2024

महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी बांधवांचे उत्पादन हे शेती आणि त्याशीसंलग्न व्यवसायांवर अवलंबून आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजना सुरू करण्यामागे महाराष्ट्र सरकारचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहायता प्रदान करणे हा आहे. ह्या योजनेला महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना किंवा महाराष्ट्र किसान वित्तीय सहायता योजना किंवा महाराष्ट्र किसान सन्मान निधी योजना असे सुद्धा म्हटले जाते. ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येतील. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंसाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून ६000 व महाराष्ट्र सरकारकडून ६000 असे एकूण १२  हजार रुपये मदत केली जाईल.

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणविषयी माहिती येथे बघा

namo shetkari yojana नमो शेतकरी योजनेविषयी प्रमुख वैशिष्ट्ये

  • वार्षिक मदत एकूण सहा हजार रुपये मिळेल जी दोन हजार रुपयांच्या तीन इन्स्टॉलमेंट्स मध्ये विभागून दिली जाईल .
  • ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसान सन्माननिधी योजनेमध्ये स्वतःचे नाव रजिस्टर केलेले आहे ते सर्व शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने डिपॉझिट/ जमाकरण्यात येणार आहे.

namo shetkari yojana 2024 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना चौथा हप्ता केव्हा मिळेल?

या योजनेच्या चौथा हप्ता हा २२ ऑगस्ट बुधवार  पासून राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथा  वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे या योजनेत राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत १८८८ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत योजनेचा चौथा हफ्ता परळी येथील कृषी महोत्सवाच्या वेळी थेट वर्ग करण्यात आला.

नमो शेतकरी योजना अधिकृत वेबसाईट  namo shetkari yojana

महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी असलेली नमो शेतकरी महासन्माननिधी योजना विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या https://nsmny.mahait.org संकेतस्थळावर मिळू शकते. https://nsmny.mahait.org वर भेट देऊन, आपला पुढचा हप्ता कधी मिळणार आहे त्याविषयी माहिती त्याचबरोबर त्याआधीच्या हप्ते आपल्याला मिळाले आहेत किंवा नाही याविषयीची सुद्धा माहिती शेतकरी बंधू घेऊ शकता.

कापूस पिकातील किड नियंत्रणाविषयी माहिती बघण्यासाठी येथे दाबा

काही शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक नातेवाइकांचे, मित्रांचे दिले आहेत किंवा मोबाईल क्रमांक बदललेले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. या शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे काम सुरू आहे. नमो सन्मान योजनेचा लाभ घेताना मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर पी. एम. किसान योजनेचाही लाभ या वंचित लाभार्थ्यांना मिळणार आहे.

namo shetkari yojana नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपल्याला मिळाला किंवा नाही हे कसे तपासणार
  • एकदा का शासनाने चौथा हप्ता भरला की आपण ऑनलाइनच आपल्या बँक खात्यांत पैसे जमा झाले आहेत किंवा नाही ते तपासू शकतो
  • नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://nsmny.mahait.org येथे नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
  • लाभार्थी स्थितीमध्ये प्रवेश करा: मुख्यपृष्ठावर, “लाभार्थी स्थिती” विभाग शोधा.
  • तपशील प्रविष्ट करा: तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड द्या.
  • ओटीपी मिळवा: “मोबाईल ओटीपी मिळवा” वर क्लिक करा.
  • स्थिती तपासा: OTP प्रविष्ट केल्यानंतर, तुमच्या चौथ्या हप्त्याची पेमेंट स्थिती पाहण्यासाठी “स्थिती दर्शवा” वर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया सुनिश्चित करते की तुम्ही थेट पेमेंटचा मागोवा घेऊ शकता आणि पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत की नाही याची खात्री करू शकता.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्राचा विचार केला असता सध्या विदर्भातील पावसाचे प्रमाण खूप जास्त झालेले  आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूनी  पावसाची उघड झाल्यानंतर तात्काळ आपल्या शेतामध्ये आंतर मशागत करणे खूप खूप जरुरी आहे. विदर्भातील शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची योग्यरीत्या काळजी घेण्यासाठी आवश्यक ते कीटकनाशकाचा फवारा मारणे  आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंनी खताचा दुसरा डोस दिलेला नसेल तो सुद्धा  लवकरात लवकर देणे सुद्धा आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या खानदेश विभागामध्ये कापूस पिक साधारण ८० ते ९० दिवसांचा झालेला आहे. खानदेश विभागातील शेतकऱ्यांनी आता फवारणी करत असताना गुलाबी बोंड अळीचा नियंत्रणाचा फवारा घेणे जरुरी  आहे त्याचबरोबरबॊण्ड सड  रोखण्यासाठी कोणतेही चांगले बुरशीनाशक ची फवारणी  घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ यूपीएल कंपनीचे साफ हे बुरशीनाशक  २५ ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन  फवारणी करू  शकता किंवा बेयर कंपनी चे एन्टरकॉल ५० ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन  फवारणी करू  शकता

Leave a Comment