Naukri in Germany जर्मनीत ड्रायव्हर इलेक्ट्रिशियन नर्सेस सर्वांना महिना अडीच लाख रुपये कमवायची संधी

वाचक मित्रांनो,

नमस्कार !  तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती गजानन चे आगमन झालेले आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे आपल्या मागील एका ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रीयन तरुणाला जर्मनीमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याविषयी जाणून घेतले आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये जर्मनीत काम करण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. Naukri in Germany

Naukri in Germany खालील 30 कौशल्य प्रकारांना जर्मनीत रोजगाराची संधी 

मित्रांनो, महाराष्ट्र शासन आणि जर्मनी येथील बाडेन वूटेनबर्ग  या राज्याशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच जाहीर केलेल्या जीआर नुसार राज्य सरकार परिचारिका (Nurses) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant), रेडिओलॉजी सहाय्यक, दंत सहाय्यक, लेखा आणि प्रशासन, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, घरकाम करणारे, इलेक्ट्रीशियन, अक्षय ऊर्जा, हीटिंग तंत्रज्ञ, चित्रकार(Painter), सुतार, (Carpenter)प्लंबर (Plumber), वाहन दुरुस्तीसाठी मेकॅनिक, ड्रायव्हर्स (बस, ट्राम, ट्रेन, ट्रक), सुरक्षा, डिलिव्हरी, पॅकर आणि मूव्हर्स, विमानतळावरील सपोर्ट, क्लीनर, हाउसकीपिंग, विक्री सहाय्य आणि इतर. अशा अनेक निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळ लागणार आहे.

Naukri In Germanyजर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमित शिक्षकांनी अर्ज भरण्यासाठी येथे दाबा.

जर्मनी येथे पुरविण्यात येणाऱ्या या मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन पुणे यांच्याकडून ठराविक कालावधीनंतर घेतली जाणारी A1, A 2, B 1 व B 2 या चार प्रमाणपत्र परीक्षा नऊ ते दहा महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये किमान ९०% उपस्थिती प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आवश्यक राहील . सदर विविध परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणे प्रस्तावित आहे. या वर्गांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जर्मन भाषेचे प्रशिक्षक तयार करणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक शिक्षकांनी हा फॉर्म भरावा.

कापूस पिकातील फुलपाती गळ रोखण्यासाठी येथे दाबा

Naukri in Germany प्रत्येक जिल्ह्यातून अशी किमान एक बॅच बनवण्यात येईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षित शिक्षकांद्वारे आयोजित केले जाणारे प्रशिक्षण वर्ग खालील नियमांना अनुसरून आयोजित होतील.

१) सदरील वर्ग कमाल ४० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे असतील, ज्यात जर्मनी येथे रोजगारासाठी उपरोक्त शासन निर्णयानुसार जाण्यास इच्छुक सर्वसाधारणपणे वाहन चालक, सुरक्षा रक्षक, सुतार (कारपेंटर), नळ जोडारी (प्लंबर), आचारी (कुक), रंगारी (पेंटर) इत्यादी निवडक ३० कौशल्य प्रकारांच्या कुशल / अकुशल प्रशिक्षणार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यात येईल.

२) या प्रशिक्षणार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत जिल्हानिहाय निवडण्यात येईल.

 जर्मनीत रोजगाराची संधीसाठी अर्ज कसा कराल

1) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.कौशल्य २०२४/प्र.क्र.५१/एसडी-६, दि.११ जुलै,२०२४.नुसार आयोजित जर्मन भाषा प्रशिक्षण तसेच त्यानंतर आयोजित होणारे आवश्यक कौशल्यवृद्धी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीच सदरील अर्ज भरावा.

२) अंतिम निवड झाल्यानंतर आपणास बाडेन- वुटेनबर्ग राज्यात रोजगारासाठी शासन निर्णयातील नमूद 30 कौशल्यांनुसार काम करण्याकरिता महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग यांच्या मार्गदर्शक तत्वे,कायदे,नियम आणि सूचनांचे पालन करावे लागेल.

या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून अभ्यासक्रमाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सदर अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराच्या पहिल्या प्रवासाचा प्रवास खर्च देखील करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे.

3) शासन निर्णयात नमूद केल्यानुसार 30 कौशल्याधारित व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुरूप व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवारच सदर अर्ज भरू शकतात.

जर्मनीत नोकरी करीता अर्ज करण्यासाठी येथे दाबा

4) रोजगाराकरिता जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात जाण्याकरिता, व्हिजा मिळविण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिताच्या सोयी अर्जदारास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग राज्य यांच्या समन्वयाने संपूर्ण सहकार्य करेल.

5)या प्रकल्पांतर्गत 30 कौशल्यांसाठी आवश्यक जर्मन भाषा कौशल्यांची स्तर निहाय प्रमाणपत्र  A1, A 2, B 1 व B 2 या चार प्रमाणपत्र परीक्षा नऊ ते दहा महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये किमान ९०% उपस्थिती प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आवश्यक राहील.

6) जर्मन भाषेचा स्तरनिहाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने संबंधित कंपनीच्या अथवा राज्याच्या स्थानिक गरजेनुसार/मागणीनुसार आवश्यक निवासी तांत्रिक अभ्यासक्रम अंदाजे (०-४ महिन्याचा ) पूर्ण करणे आवश्यक आहे.

7) सदर कौशल्याच्या फरकावर आधारित निवासी अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची व अभ्यासक्रम कालावधीची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल व प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

8) नोकरीसाठीच्या भरती प्रक्रियेच्या वेळी इतर आवश्यक  मूळ कागदपत्रांसह जर्मन शासनाच्या नियमानुसार पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून मागील तीन महिन्यातील असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवारास सादर करणे आवश्यक असेल.

9) अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी. नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच उमेदवाराची निवड केली जाईल.

10) परदेशात महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये कमवायची संधी

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment