वाचक मित्र आणि मैत्रिणींना माझा सस्नेह नमस्कार !
(New Virus in China) तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुम्हा सर्वांना २०२५ हे नवीन वर्ष खूप खूप आनंदी ,निरोगी आणि समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बोलले जाते ‘आरोग्यम धनसंपदा’ ! सध्या थंडीचे प्रमाण खूप वाढलेले आहे बऱ्याच शहरांमध्ये तापमानाचा पारा हा दहा डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा खाली गेलेला आहे.
थंडीच्या या वातावरणामध्ये सर्दी खोकला होणे खूप स्वाभाविक आहे किंबहुना आपल्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये कोणालातरी सर्दी आणि खोकला झालेला सध्या दिसून येत आहे.विशेषतः घरातील लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये याचे प्रमाण आपल्याला जास्त दिसून येते आहे.त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेणे आवश्यक आहे. New Virus in China
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!
अशातच मागील काही दिवसांमध्ये New Virus in China चीनमध्ये एका नवीन विषाणूचे व्हायरसचे आगमन झालेल्या विषयीच्या बातम्या पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये बघायला आणि ऐकायला मिळत आहेत.त्याविषयी भीती बाळगण्याचे कारण नाही आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना एच एम पी व्ही हुमन मेटान्यूमो व्हायरस बद्दल माहिती देण्यासाठी आजचा ब्लॉग लिहीत आहे .
वर्षे 2020 मध्ये आपण सगळ्यांनी कोविड च्या महासाथीचे दुःखद आणि भीषण परिणाम भोगलेले आहेत आणि म्हणूनच एच एम पी व्ही ह्या व्हायरस मुळे सुद्धा कोविड सारखी महासाथ येऊ शकते का? पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकते का ?यासारखे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
New Virus in China त्यासाठी सर्वप्रथम आपण विषाणू म्हणजे काय ? हे समजून घेऊया विषाणूला सजीव मानणे देखील चूक आहे आणि निर्जीव मानणे देखील चुकीचे आहे सजीव आणि निर्जीव च्या सीमारेषेवर रेंगाळणारा अतिसूक्ष्म असा जीव आहे इतका सूक्ष्म की टाचणीच्या टोकावर सर्दी साठी कारणीभूत असणारे ५० कोटी व्हायरस (विषाणू) सहज मावू शकतात एवढा सूक्ष्म असूनही या जीवाने अवघ्या जगाला कोविड कालावधीमध्ये सळो की पडो करून सोडले होते आणि म्हणूनच कोणत्याही विषाणूचे (व्हायरस)नाव घेतले की आपले धाबे दणाणते.
हिवाळ्या ऋतूमध्ये आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगासनांची खूप चांगली मदत आपणास होऊ शकते.योगासनांचे फायदे जाणून घेण्याकरिता येथे दाबा.
New Virus in China 2024
मेटान्यूमो व्हायरसचे चीनमधील उत्तर प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे मुळात हिवाळ्यामध्ये या विषाणूंच्या रुग्णाची संख्या वाढणे हे अपेक्षित आणि स्वाभाविक आहे असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते असणाऱ्या माओ निंग यांनी स्पष्ट केले आहे मात्र या वाढत्या रुग्णसंख्यामुळे चीनमधील रुग्णालयांवर बिकट परिस्थिती उडवली आहे किंवा तेथील रुग्णालय भरून वाहत आहेत रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत असे काहीही चीनमध्ये घडलेले नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.
New Virus in China पण असे असले तरी हा जो नवीन विषाणू चीन मधून पुन्हा एकदा बातम्यांमध्ये डोकावतो आहे त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही हा विषाणू आपल्या देशात मागील जवळपास २४ वर्षापासून माहिती आहे अनेक देशांमध्ये तो विषाणू म्हणजे सर्दी खोकल्याचा हंगामात अर्थात हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला नियमितपणे आढळतो .
New Virus in China ह्यूमन मेटान्यूमो वायरस हा अत्यंत सोम्य प्रकाराचा विषाणू आहे त्याच्यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते म्हणजेच ह्या विषाणूत फुफुसांपर्यंत पोहोचून निमोनिया होण्याची शक्यता अत्यंत कमी असते सर्दी खोकला व ताप एवढीच याची सामान्य आणि सौम्य लक्षणे आढळून येतात .
या विषाणूकरता कुठलेही विशेष असे औषध नाही सर्दी खोकल्या करता आपण जो लक्षणांवर आधारित उपचार घेतो तो उपचार आणि गुळण्या करणे, वाफ घेणे, काडा पिणे यासारखे घरगुती उपचार यामुळे या विषाणूमुळे झालेला आजार सहज बरा होऊ शकतो ५ वर्षाखालील लहान मुले आणि ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक ज्यांची प्रतिकार शक्ती काही कारणामुळे कमी झालेली आहे यांच्यामध्ये या विषाणूमुळे निमोनिया किंवा इतर लक्षणे आढळू शकतात परंतु याचे प्रमाण सुद्धा अगदीच नगण्य आहे.
New Virus in China व्हायरस (विषाणू) पासून कशी काळजी घ्यावी?
- सर्वप्रथम नियमित हात धुणे .
- सर्दी खोकला असेल तर मास्क वापरणे .
- आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार करणे.
- जनसंपर्क कमी करणे.
- धूम्रपान न करणे.
- इतस्तथा थुंकण्याची सवय सोडणे
- मानसिक अथवा शारीरिक ताण टाळणे .
- पुरेशी विश्रांती घेणे.