शेतकरी बंधूंनो नमस्कार,
शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत की October Monsoon ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीचा मानसून पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कधी पडू शकतो याविषयी. ऑक्टोबर महिन्यामध्ये खरीप हंगामात पेरलेली बरीच पिके हे काढण्यासाठी तयार झालेली असतात तुमच्या शेतात सुद्धा सोयाबीन मक्का बाजरी ज्वारी हे पिके हे पिके आता काढण्यासाटी तयार झालेली असतील.
आपल्या हातात तोंडाशी आलेला घास हा वाया जाऊ नये म्हणून ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस कधी पडणार आहे व कोणत्या भागात पडणार आहे हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून आपण खरीप हंगामात लावलेली पिके काढण्यासाठीचे नियोजन व्यवस्थित रित्या करू शकणार.
October Monsoon ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस २०२४
आपल्या देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये ९३४ मिलीमीटर इतका पाऊस पडलेला असून मागील वर्षाच्या ८६८ मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत हा पाऊस जवळजवळ आठ टक्के जास्त आहे. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा (मान्सूनचा) परतीच्या प्रवासाला सुरुवात ही झालेली असून 23 सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छ मधून परतीच्या प्रवास सुरू केला २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सून परतल्यानंतर मान्सूनची वाटचाल साधारण आठ दिवस थबकली होती.
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर चा हप्ता केव्हा मिळेल
October Monsoon २ ऑक्टोबर पासून पुन्हा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि मान्सून संपूर्ण जम्मू-काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा दिल्ली या राज्यांमधून पूर्णपणे माघार घेतलेली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातचा लक्ष्मी पूर खेरी शिवपुरी कोटा उदयपूर दिशा सुरेंद्रनगर जुनागड पर्यंतच्या भागातून मान्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केलेले आहे
महाराष्ट्र राज्याच्या विचार करता दिनांक ६ ऑक्टोबर पासून ते ९ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर हा पश्चिम महाराष्ट्रातील भाग त्याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग धाराशिव लातूर नांदेड परभणी येथे भाग बदलत कुठे हलका मध्यम तर कुठे जोरदार याप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही प्रमुख जिल्हे अकोला ,अमरावती, वर्धा यवतमाळ या ठिकाणी सोयाबीन काढण्याचे काम सध्या जोरात चालू आहे त्या लोकांनी नऊ तारखेपर्यंत आपले सोयाबीन हे काढून घ्यावे ही विनंती. कारण दिनांक ११ ऑक्टोबर पासून १३ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ दोन्ही भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
October Monsoon दिनांक ९ ऑक्टोबर पासून ते १३ ऑक्टोबर पर्यंत पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे
October Monsoon उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मका काढण्याचे त्याचबरोबर कापूस वेचणीचे काम सध्या जोरात सुरू आहे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे नऊ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता एकदम कमी आहे एखाद दोन ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यामुळे त्यांनी आपले कापूस वेचणीचे व मका पीक काढण्याचे काम लवकरात लवकर उरकून घेणे जेणेकरून आपल्या आता तोंडाशी आलेला घास हा मातीत जाणार नाही.
October Monsoon कमी दाब किंवा चक्राकार स्थिती गुजरातकडे सरकल्यास राज्यात दिनांक १५ ते १९ऑक्टोबर या कालावधीमध्ये सुद्धा भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता Skymet स्कायमेट या खाजगी वेधशाळेने वर्तवली आहे. दक्षिण भारतामध्ये चक्राकार स्थिती तयार होण्याची शक्यता आहे व चक्रकार स्थितीचे रूपांतर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होऊ शकते याच्या प्रभावामुळे वरील परिस्थिती राहील.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने विषयी माहिती येथे बघा
सत्य परिस्थितीमध्ये हिंदी प्रशांत महासागराच्या टॉपच्या चार मॉडेल नुसार न्यूट्रल कंडिशन सक्रिय आहे न्यूट्रल कंडिशन सुद्धा पावसासाठी पोषक असते परंतु पावसासाठी अत्यंत अनुकूल असलेली ला निना ही परिस्थिती ऑक्टोबर महिन्यामध्ये पॉझिटिव्ह होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे व जर तसे झाल्यास ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एवढेच नव्हे तर जानेवारी या चारही महिन्यांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण राहू शकते. त्याचबरोबर आयओडी इंडियन ओशन डायपॉल (IOD)जानेवारी २०२५ पर्यंत न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे परंतु फेब्रुवारी २०२५ पासून मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे जर तसे झाले तर या चारही महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक यांनी सुद्धा परतीच्या पावसाविषयी अंदाज व्यक्त केलेला आहे.