Parawilting सावधान कापूस पिकातील आकस्मिक मर रोग

मित्रांनो नमस्कार ,

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांच्या कृपेने तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण व्हाव्या. तुम्ही सुखी आणि समृद्धी व्हावे हीच श्रीं चरणी प्रार्थना. IIश्री गणेशाय नमःII Parawilting

Parawilting शेतकरी बांधवांना आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये कापूस पिकामध्ये येणाऱ्या आकस्मिक मर रोगाविषयी जाणून घेणार आहोत सध्या खानदेश विभागाचा जर विचार केला तर कापूस पीक हे साधारण ९० ते ९५ दिवसाचे झालेले आहे त्याचबरोबर मराठवाडा मध्ये कापूस पिक ८० ते ८५ दिवसाचे झाले आहेत आणि विदर्भामध्ये साधारण ७० ते ७५ दिवसाचे आपले कापसाचे पीक आहे.

पिक विमा नुकसान भरपाई विषयी अधिक माहितीसाठी येथे दाबा

आता कापूस पीक हे पाती फुले आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये आहे अशा परिस्थितीत कापूस पिकाला समतोल प्रमाणात  सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी यांची गरज असते आता आपल्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण  हे अधिक प्रमाणात झालेले आहे आणि सूर्यप्रकाश सुद्धा हवा तेवढा मिळत नाहीए.

Parawilting कापूस पिकात पाती,फुले मोठया प्रमाणात का गळत आहे

जास्त पावसामुळे आणि सततच्या असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांची  पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा थांबलेली दिसत आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे कापूस पिकाला पुरेशे प्रमाणामध्ये जमिनीत उपलब्ध असलेले मूलद्रव्य हे घेता येत नाहीये. अशा सर्व विषम परिस्थितीमुळे कापूस पिकामध्ये बोंडे लागण्यास सुद्धा विलंब होत आहे त्याचबरोबर बोंडे लागायचे प्रमाण सुद्धा कमी झालेले आहेत तसेच कापूस पिकामध्ये लागणारी पाती आणि फुले यांचे  गळण्याचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

Parawilting आकस्मिक मर रोगाची कारणे

मित्रांनो ज्याप्रमाणे हवामानामध्ये बदल झाला तर आपण सुद्धा आजारी पडतो त्याच  सततच्या जास्त पावसामुळे आणि नंतर अचानक पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे कापसाच्या झाडाची  वातावरणाच्या बदलाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याच्या व्यवस्थेमध्ये काहीसा अडथळा निर्माण होतो.

  • हवामानात झालेले अचानक बदल जसे दीर्घ कालावधीनंतर पाऊस किंवा दीर्घ कालावधीच्या पावसानंतर अचानक ऊन तापणे.
  • भारी जमिनीमध्ये जास्त कालावधीसाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते त्यामुळे कापूस पिकाच्या मुळांना पुरेशी हवा उपलब्ध होत नाही.
  • जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण व आद्रता म्हणजेच शेताच्या काही भागांमध्ये जास्त कालावधीसाठी पाणी भरून असणे

Parawilting आकस्मिक मर रोगाची लक्षणे

खाली आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिलेली आहेत जर त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काही झाडे आढळून आली तर आपल्या शेतात आपल्या कापसाच्या झाडांना आकस्मिक मर रोग झाला आहे असे समजावे.

  • आदल्या दिवशी पर्यंत कापसाचे झाड चांगले दिसते व दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक कापसाच्या झाडाची पाने मलुल होऊन खालच्या दिशेने वाकलेली दिसतात व संपूर्ण झाड मेल्यागत दिसते
  • नंतर दोन ते तीन दिवसात संपूर्ण पाने हे गळून पडतात आणि झाडाला फक्त उरसुर बोंडे लागलेले दिसतात.
  • शेतात वेगवेगळ्या काही भागांमध्ये अशा प्रकारची झाडे आपल्याला दिसून येतात.
  • विशेषता ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात पाण्याची साठवण झालेले असते अशा ठिकाणी तसेच भारी जमिनीमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
  • या रोगाची लक्षणे पिक हे फुले आणि बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये असताना जास्त प्रमाणात दिसून येते.

Parawilting आकस्मिक मर रोगाचे व्यवस्थापन

मित्रांनो आता आपण आकस्मिक मर म्हणजे काय त्याचबरोबर आकस्मिक मर रोगाची लक्षणे इत्यादी माहिती घेतली आता आकस्मिक मर रोगाचे नियंत्रण कसे करावे त्याविषयी खाली जाणून घेऊया.

  • सर्वप्रथम पाण्याचा योग्य निचरा करणे म्हणजेच ज्या भागांमध्ये पावसाचे जास्त पाणी साठलेले आहे त्या भागात जमिनीला आडवे किंवा उभे चर  देऊन जास्तीचे पाणी  शेताच्या बाहेर काढणे.
  • शेतात वरील लक्षणे दिसल्यापासून दोन ते तीन दिवसाच्या  आत कॉपर ऑक्सिक्‍लोराईड (ब्लू कॉपर २५%) हे ५० ग्राम  आणि त्यामध्ये दीडशे ते दोनशे  ग्रॅम युरिया मिसळून १५ लिटर पाण्यात टाकावे
  • नंतर प्रादुर्भावग्रस्त झाडांजवळ बांगडी पद्धतीने साधारण शंभर मिलि द्रावण पडेल असे द्यावे त्याचबरोबर आजूबाजूच्या चार ते पाच झाडांना सुद्धा हे द्रावण द्यावे.
  • झाडाचे खोड ढिले झाले असेल तर ते व्यवस्थित दाबून घ्यावे.

कापूस पिकातील पातेगळ रोखण्यासाठी काय करावे

  • चमत्कार हे १५ ते २० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • किंवा इग्निटस १० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • खूप जास्त प्रमाणात पातेगळ असल्यास प्लॅनो फिक्स ४ ते ५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • कापूस पीक ९० दिवसाच्या पुढे असल्यास ४० ग्राम १३:००:४५ हे १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करणे.

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment