Pearl Millet हिवाळ्यात बाजरी खाणे का आहे उत्तम ?

वाचक मित्र आणि मैत्रिणींना माझा सस्नेह नमस्कार !

महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीचे प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे काही शहरांमध्ये तापमान हे दहा डिग्री सेंटीग्रेड पेक्षा खाली गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या शरीराला कशा पद्धतीने उपदार उबदार ठेवू शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. Pearl Millet

मित्रांनो थंडीचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्या शरीराला थोडी उब  मिळावी म्हणून आपण बाहेरून स्वेटर घालत असतो किंवा उबदार कपडे घालतो परंतु आतून जर आपण  आपल्या शरीराला ऊबदार करू शकलो तर किती बरे होईल.बाजरीचा गुणधर्म उष्ण असल्या कारणाने हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगले मानले जाते, म्हणूनच आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये बाजरी (Pearl Millet) या महत्त्वाच्या पिकाविषयी बोलणार आहोत.

                   महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

 Pearl Millet २०२४

शेतकरी बंधू आता बाजरी पिकाच्या लागवडीला सुरुवात करणार आहे. तृणधान्याचे महत्त्व पटल्याने व त्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी ही ज्वारी ,बाजरीच्या लागवडीकडे आता वाढत आहेत. तृणधान्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून गेल्या वर्षी 2023 आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले. त्यामुळे आरोग्यासाठी पौष्टिक आणि खाण्यासाठी स्वादिष्ट असे ज्वारी आणि बाजरी या पिकाचे उत्पादन क्षेत्र वाढले (Pearl Millet).

सतत वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी सगळ्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये बाजरी सारखे लवचिक तृणधान्ये   एक परवडणारा स्वस्त आणि पौष्टिक पर्याय बनू शकतो आणि म्हणूनच बाजरीच्या लागवडीला चालना देण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे हे आवश्यक आहे.

बाजरीच्या भाकरीचे सेवन करून आपले आरोग्य कशा पद्धतीने चांगले ठेवू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोतबाजरी हे महाराष्ट्राचे उच्च पौष्टिक मूल्य असलेले अविश्वसनीय पीक आहे.

बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे: Pearl Millet 2024

 मधुमेहाच्या आहारासाठी चांगले :-

भारतात, अंदाजे ७७ दशलक्ष लोक ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे ते मधुमेहाने ग्रस्त आहेत (टाइप 2) आणि जवळपास २५ दशलक्ष प्रीडायबेटिस आहेत (नजीकच्या भविष्यात मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे). ५० % पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल माहिती नसते ज्यामुळे लवकर शोधून उपचार न केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मधुमेह असलेल्या प्रौढांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका दोन ते तीन पटीने वाढतो बाजरीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे हळूहळू पचतात आणि दीर्घ काळासाठी स्थिर ग्लुकोज पातळी राखतात. यामुळे ते मधुमेहींसाठी हेल्दी फूड पर्याय आहे.

              डायबेटिस /मधुमेह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी येथे दाबा

 हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर –

आपल्या दैनंदिन आहारातील तंतू आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे गुणधर्म भरपूर प्रमाणात असल्याने हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले आहे. रक्तदाब कमी करते बाजरी पोटॅशियमच्या समृद्धतेसाठी ओळखली जाते जी उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी आवश्यक आहे. पोटॅशियम समृध्द अन्नपदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातून सोडियम बाहेर पडण्यास मदत होईल. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

Pearl Millet बाजरी मधील काही पोषक तत्वे आपल्या त्वचेला केसांना आणि नखांना निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहेत. बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते– बाजरीच्या सेवनाने, आतड्याचे आरोग्य चांगले राहते. सोप्या भाषेत, बाजरी खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता दूर ठेवण्याची खात्री होईल. त्यामागील कारण म्हणजे बाजरीत अघुलनशील फायबरचे अस्तित्व. वारंवार आंबटपणा आणि पोटात अल्सर असलेल्या लोकांसाठी उपचारात्मक  बाजरी  पोटातील आम्लता कमी करते ज्यामुळे अल्सर तयार होणे आणि ऍसिडिटीच्या वारंवार होणारा त्रास कमी होतो.

Pearl Millet लोह आणि फॉलिक ऍसिड ची भरपूर मात्रा –

बाजरी पिकातील लोह आणि पलिक ऍसिड या सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे गर्भवती महिलांना आणि नर्सिंग मातांसाठी बाजरी ही आहाराची योग्य निवड आहे त्यामुळे त्यांचे  बाजरी मधील अपेक्षा फॉस्फरसमुळे त्यांचे हाडे मजबूत होण्यास मदत होते

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध –

शरीरातील फ्री रॅडिकलचे नुकसान कमी करते आणि लवकर वृद्धत्व, अल्झायमर रोग, पार्किन्सन रोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि जखमा बरे होण्यास मदत करते.

वजन व्यवस्थापन आणि लठ्ठपणासाठी आदर्श– वजन नियंत्रित करण्यासाठी व लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा बाजरीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्याने फायदा होतो.

आरोग्यदायी बाजरी  ही आपल्याला मधुमेहापासून, हृदयरोगापासून, बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवू शकते व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करू शकते. आपल्याला चीर तरुण राहण्यासाठी सुद्धा बाजरीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्याने आपल्याला फायदा मिळू शकतो.अशाप्रकारे  बाजरीच्या भाकरीच्या सेवनाने आपल्याला असंख्य फायदे मिळू शकतात.

Pearl Millet  यु एस ७७११

शेतकरी बंधूंनो यु एस ॲग्री सीड ही कंपनी गेल्या २५ वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काम करत आहे. शेतकरी बंधूंनो जर आपल्याला बाजरी पिकाची लागवड करायची असेल तर यु एस ॲग्री सीड या कंपनीचे यु एस ७७११ हे वाण सध्या बाजारात उपलब्ध आहे.

या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे…

  • लांब मोठे आणि ठोस कणीस
  • मोठे चमकदार दाणे
  • जास्त फुटवे आणि भरपूर उत्पन्न
  • परिपक्वतेच्या वेळी हिरवा चारा

                                      “यु एस ७७११ चा वादा उत्पन्न देईल अपेक्षेपेक्षा जादा”

                  महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

 

Leave a Comment