शेतकरी बंधूंनो नमस्कार,
तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस पिकाची लागवड पूर्ण झालेली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी पाऊस सुद्धा बऱ्यापैकी असल्या कारणाने सध्या कापूस पिकाला कुठल्याही प्रकारचा ताण सहन करावा लागलेला नाही. Pink Bollworm
महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी बांधवांसाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. गेल्या हंगामात कापूस पिकाला अपेक्षेप्रमाणे दर मिळाला नाही हे आपणा सर्वांना माहिती आहेच. सध्या आपल्या भागातील कापसाचे पिक हे फुलोरा अवस्थांमध्ये आलेले आहे. Pink Bollworm गुलाबी बोंड आळी ही कापूस पिक फुलोरा अवस्थेमध्ये असताना तसेच बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये असताना हल्ला करत असते.
आता आपल्या कापसाच्या पिकाला बोंड अळी पासून संरक्षण देणे खूप गरजेचे आहे. कारण गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात असला तर आपल्या उत्पन्नाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अमावस्येच्या दोन तीन दिवस नंतर च्या रात्री मध्ये गुलाबी बोंड अळीची मादी जास्त प्रमाणात अंडी घालते. ४ ते ५ दिवसांनी अंडी मधून अळी बाहेर पडते सुरुवातीची अळी ही पांढऱ्या रंगाची असते. अंड्यातून बाहेर आलेली Pink Bollwormअळी लगेचच जवळच्या पातीमध्ये किंवा फुलांमध्ये किंवा बोंडांच्या मध्ये प्रवेश करते.
Pink Bollworm गुलाबी बोंड अळी २०२४
फुलांमध्ये प्रवेश केलेली अळी ही लगेचच फुलांच्या पाकळ्या बंद करते आणि आत मध्ये आपली उपजीविका करते.बंद असलेल्या फुलाला आपण डोमकळी म्हणून ओळखू शकतो. बोंडांच्या आत मध्ये शिरलेली अळी ही कापसाची सरकी खाऊन आपले पोट भरत असते हे करत असताना ती कापसाची गुणवत्ता ही खराब करत असते त्याच्यामुळे परिपक्व झालेली बोंडे ही व्यवस्थितपणे फुटत नाही परिणामी कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
Pink Bollworm Life Cycle गुलाबी बोंड अळीचे जीवन चक्र:
गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळविण्या आधी आपल्याला गुलाबी बोंड आळी चे जीवन चक्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. गुलाबी बोंड अळीचा पतंग राखाडी रंगाचा असतो मादी ही फुलांजवळ किंवा पातीं जवळ अंडी घालत असते. या अंड्यांमधून चार ते पाच दिवसांनी अळी ही बाहेर पडते त्या अळी ला आपण पहिल्या अवस्थे मधील अळी आहे असे म्हणतो. सुरुवातीला तिचा रंग हा पांढरा असतो तसेच ते अंड्यातून बाहेर पडल्यानंतर लगेचच जवळच्या पाती किंवा फुलांमध्ये आत शिरते.
Pink Bollworm बोंडांमध्ये शिरलेली अळी ही बोंडा मधील बी किंवा सरकी खाऊन आपले जीवन चक्र चालू ठेवते बोंडात अळी ही तिच्या चार अवस्था पूर्ण करते. त्यासाठी साधारण २५ ते ३० दिवसाच्या कालावधी लागतो आणि अशा पद्धतीने संपूर्ण बोंडा मधील सरकी अळी खाऊन फस्त करते त्याच बरोबर बोंडातील धागा सुद्धा ती तिच्या विष्ठेने खराब करत असते. अशा पद्धतीने गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव झालेले बोंडे ही व्यवस्थित फुटत नाही आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागते.
पूर्णपणे वाढ झालेली अळी त्यानंतर जमिनीत कोषा अवस्थेत जाते त्यामध्ये साधारण ती सात ते आठ दिवस असते आणि मग त्याच्यातून नर किंवा मादी पतंग बाहेर येतो जो पुढचे पाच ते सात दिवसांमध्ये अंडी घालायचं काम करतो अशा पद्धतीने गुलाबी बोंड अळीचे हे एक जीवन चक्र हे ४० ते ४५ दिवसात पूर्ण होते.
कापूस कीड नियंत्रण अधिक माहितीसाठी येथे दाबा
गुलाबी बोंड अळीचे निरीक्षण?
गुलाबी बोंड अळी ने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे किंवा नाही हे बघण्यासाठी तुमच्या शेतामध्ये एक एकर क्षेत्र आधी तुम्हाला निवडायचा आहे. नंतर नागमोडी पद्धतीने कोणतेही वीस झाडे आपल्याला निवडायचे आहेत. मग त्या प्रत्येक झाडाचे एक हिरवी बोन्डे किंवा एक फुल आपल्याला तोडायचे आहे अशा पद्धतीने वीस झाडांची वीस बोन्डे किंवा वीस फुले आपण गोळा करायची आहे.
आता आपल्याला या २0 बोंडांचे किंवा वीस फुलांचे निरीक्षण करायचं जर यामध्ये आपल्याला कमीत कमी २ बोंडे किंवा २ फुलांमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली तर गुलाबी बोंड आळीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे असे समजावे.
थोडक्यात दहा टक्के बोन्डे किंवा फुलांना गुलाबी बोंड अळीने नुकसान केलेले असल्यास समजावे की आता गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाची फवारणी घेणे आवश्यक आहे.
Pink Bollworm Management गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन:
- गुलाबी बोन्ड अळीच्या पहाणीसाठी कामगंध (फेरोमन) सापळे २ प्रति एकर लावावे.
- कामगंध (फेरोमन) सापळ्यात कमितकमी २४ पतंग प्रति सापळा तीन रात्रीत अडकले असल्यास खालील उपाय योजना कराव्यात.
- गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकरी ८ कामगंध सापळ्यांचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणात नर पतंगाला अडकवून नष्ट करू शकतो.
किटकनाशक | प्रमाण/ली | फवारणीची वेळ |
नीम आधारित किटकनाशक [1500 ppm] | 5 मिली/ली | 45 दिवस |
थायोडिकार्ब 75% डब्ल्यू पी | 2 ग्रॅम/ली | 60 दिवस |
क्लोरपायरीफॉस 20 ई.सी. | 2.5 मिली/ली | 90 दिवस |
लैम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी | 1 मिली/ली | 120 दिवस |
(संदर्भ:सी.आय.सी.आर,नागपूर) प्रमाण प्रति लिटर पाण्यात नॅपसॅक स्प्रेयर साठी.
याबरोबरच ६० ते १०० दिवसाच्या कालावधीमध्ये प्रोफेनोफोस Profenophos ५0 EC @ 30 ml किंवा Emamectin benzoate प्रोक्लैम (Proclaim) ५SG @ ५g किंवा Indoxacarb 14.5 SC @ ५ml किंवा Chlorpyriphos 20 % EC (क्लोरोपायरीफॉस)@ 2५ml किंवा Quinalphos 20AF(किनॉलफॉस) @ 2५ml प्रति 10 लिटर पाण्यात या कीटकनाशक औषधांची फवारणी घेऊ शकतात.