बंधूंनो नमस्कार,
तुम्हा सगळ्यांना २ सप्टेंबर ला येणाऱ्या बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
Pink Bollworm in Cotton आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये गुलाबी बोंड अळी आणि अमावस्या यांच्यात नेमका काय संबंध आहे ते जाणून घेणार आहोत. सध्या आपले कापूस पीक हे फुले आणि बोंडे लागायच्या अवस्थेमध्ये आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस समाधानकारक झालेला आहे.
Pink Bollworm in cotton सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस पिकाचे बोंड आळी पासून संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे कारण गुलाबी बोंड अळी जर एकदा का बोंडाच्या आत मध्ये शिरली तर ती तिच्या विष्टीने आत मध्ये प्रवेश केलेले छिद्रे बंद करते त्यामुळे आपण वरून कितीही कीटकनाशकांचा वापर केला तरी शंभर टक्के आपल्याला गुलाबी बोंड आळी पासून नियंत्रण मिळत नाही.
Pink Bollworm in Cotton गुलाबी बोंड अळी 2024
कापूस पिकामध्ये मुख्यतः तीन प्रकारच्या अळीचा प्रादुर्भाव होत असतो ज्यामध्ये ठिपक्यांची बोंड अळी अमेरिकन बोंड अळी आणि Pink Bollworm गुलाबी बोंड अळी यांचा समावेश होतो. वाचक मित्रांनो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठिपक्यांची बोंड आळी किंवा अमेरिकन बोंड आळी तर कापसामध्ये सहसा दिसत नाही परंतु गुलाबी बोंड आळी हीच प्रामुख्याने का म्हणून जास्त प्रमाणात आढळून येते.
Pink Bollworm in Cotton गुलाबी बोंड आळीने प्रतिकारक्षम शक्ती कशी विकसित केली?
ठिपक्यांची बोंड अळी किंवा अमेरिकन बोंड आळी आपल्या उपजीविकेसाठी कापूस पिका व्यतिरिक्त इतर पिके जसे वांगे,भेंडी, मका ,भात या सारख्या इतर अनेक पिकांवर आपले जीवनचक्र सुरु ठेवत असतात. परंतु गुलाबी बोंड आळी इतर कुठल्याही दुसऱ्या पिकावर आपली उपजीविका करू शकत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक जीवाला जीवन जगण्याचा अधिकार असतो आणि गुलाबी बोंड आळी ही सुद्धा त्या नियमाला अपवाद नाही.
तिला तिचे जीवन चक्र चालू ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त कापूस पिकावरच अवलंबून राहावे लागते. आता तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये ९९% पेक्षा जास्त कापूस लावला जातो तो बीटी कापुस आहे. कापूस पिकामध्ये बीटी बियाण्यासोबत नॉन बी टी बियाणे ची सुद्धा छोटे पॅकेट पूर्वी दिले जात होते परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांनी नॉन बी टी बियाणे चे कापूस हा बी टी बियाणे सोबत लावले नाही.
आता सगळीकडे बीटी बियाण्याची लागवड केलेली असल्यामुळे मागील १५ वर्षापासून गुलाबी बोंड अळीचे नर पतंग आणि मादी पतंग यांच्यात मिलन झाल्या नंतर त्यांची जी नवीन पिढी तयार झाली त्या पिढीने हळूहळू बी टी जिनला प्रतिकारक शक्ती विकसित केली आणि मग आता मागील पाच वर्षापासून त्यांची सुपर प्रोजीनी शक्तिशाली पिढी चे प्रमाण हे अनेक पटींनी वाढले आणि म्हणूनच गुलाबी बोंड अळी ही आता बीटी जीन्स प्रोटीन ला पूर्णपणे (डायजेस्ट) करते,पचवून टाकते आणि त्यामुळे गुलाबी बोंड आळी मध्ये शंभर टक्के रेजिस्टन्स डेव्हलप झाला आणि म्हणूनच ती आता बीटी विष ला मानत नाही.
कापूस कीड नियंत्रण अधिक माहितीसाठी येथे दाबा
Pink Bollworm अमावस्या आणि गुलाबी बोंड अळी संबंध
शास्त्रीय प्रयोगाच्या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की अमावस्येच्या दोन रात्री आधी आणि दोन रात्री नंतर च्या कालावधीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या मादी चे अंडी घालण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे अमावस्या नंतर साधारण पाच ते सहा दिवसांनी त्या अंड्यांमधून अळी ही बाहेर निघते व जवळच असलेल्या पातीमध्ये फुलांमध्ये किंवा बोंडामध्ये प्रवेश करते आणि म्हणूनच आपल्याला दोन दिवसांनी येणारी अमावस्या लक्षात घेऊन कीटकनाशक फवारणीचे नियोजन करायचे आहे.
आत फुलांमध्ये प्रवेश केलेली अळी ही लगेचच चिकट द्रवाने फुलाच्या पाकळ्या बंद करते त्याला आपण डोमकळी असे म्हणतो तसेच बोंडामध्ये शिरलेले अळी तिच्या विष्टेने बोंडाचे लहान छिद्रे बंद करते व आत मध्ये राहून ही कापसाची सरकी खाऊन आपले पोट भरत असते हे करत असताना ती कापसाची गुणवत्ता ही खराब करत असते त्याच्यामुळे परिपक्व झालेली बोंडे ही व्यवस्थितपणे फुटत नाही परिणामी कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
Pink Bollworm Cotton Management गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन
- गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकरी आठ कामगंध सापळे वापरून मोठ्या प्रमाणामध्ये गुलाबी बोंड अळीच्या नर पकडून नष्ट करू शकतो
- रासायनिक कीटकनाश फवारणी मध्ये सुरुवातीला नीम आधारित कीटकनाशक (१५००) ५मिली प्रतिलिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करू शकतो. त्यानंतर थायोडीकार्ब (75 डब्ल्यू पी) २ ग्राम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी घेऊ शकतो ज्यामुळे अंडी सुद्धा नष्ट होऊ शकतात.
- ६० ते १०० दिवसाच्या कालावधीमध्ये प्रोफेनोफोस Profenophos 50 EC @ ५० मिली किंवा Emamectin benzoate प्रोक्लैम (Proclaim) 5SG @ ८ ग्राम किंवा Indoxacarb 14.5 SC @ ८ मिली किंवा Chlorpyriphos 20 % EC @ ३५ मिली किंवा Quinalphos 20AF @ ३५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात या कीटकनाशक औषधांची फवारणी घेऊ शकतात.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा