वाचक मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये PM Sr Citizen Health Plan प्रधानमंत्री ज्येष्ठ आरोग्य विमा योजनेविषयी जाणून घेणार आहोत. पूर्वी आपल्या देशामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायचे परंतु सध्या देशात विभक्त कुटुंबाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे खूप खूप आवश्यक आहे.
PM Sr Citizen Health Plan बऱ्याच कुटुंबामध्ये मुलं हे शिकून बाहेरगावी किंवा परदेशात स्थायिक होतात आणि त्यांचे आई-वडील मात्र हे गावातच राहतात अशा परिस्थितीत प्रधानमंत्री जेष्ठ नागरीक आरोग्य योजना ही सर्व जेष्टाना वरदान ठरेल यात मला काहीच शंका वाटत नाही.
PM Sr Citizen Health Plan प्रधानमंत्री ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना २०२४
भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन या आरोग्य योजनेचा विस्तार करत ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा ची सुरक्षा प्रधान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता या ज्येष्ठांना मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपण सर्वांनाच चांगली माहिती आहे की कोविड काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवलेला त्रास महागाईमुळे वैद्यकीय उपचारांचा वाढलेला खर्च या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे.
व्यक्तीच्या सामाजिक किंवा आर्थिक स्थितीकडे किंवा प्रत्यक्षात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पातळीकडे लक्ष न देता ही सार्वजनिक आरोग्य सेवेची सुविधा सरसकट सत्तर वर्षे व त्यापुढील वायाच्या सर्व नागरिकांना देऊ केलेली आहे. या वयोगटातील जवळजवळ साडेचार कोटी कुटुंबातील अतिरिक्त ६ कोटी जेष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे असे सरकारी निवेदनात म्हटले गेलेले आहे.
ई पीक पाहणी अंतिम मुदत जाणून घेण्यासाठी येथे दाबा
सर्व पात्र जेष्ठ नागरिकांना आता नवे कार्ड दिले जाणार आहे. या योजनेमुळे आता देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आजारपणाच्या खर्चाची आर्थिक चिंता कायमची कमी होण्यास मदत होणार आहे. विकसित देशात पुरवल्या जाणाऱ्या सुविधा प्रमाणे सुविधा आता आपल्या भारत देशात सुद्धा मिळू शकतील हे खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे. असे म्हण्यास हरकत नाही.
प्रधानमंत्री ज्येष्ठ आरोग्य विमा चे मुख्य फायदे PM Sr Citizen Health Plan
- PM-JAY लाभार्थींना सेवेच्या ठिकाणी म्हणजेच हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवांसाठी कॅशलेस प्रवेश प्रदान करते.
- यामध्ये प्री-हॉस्पिटलमध्ये 3 दिवस आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा 15 दिवसांचा खर्च जसे की डायग्नोस्टिक्स आणि औषधे समाविष्ट आहेत.
- कुटुंबाचा आकार, वय किंवा लिंग यावर कोणतेही बंधन नाही.
- सर्व पूर्व-अस्तित्वातील परिस्थिती पहिल्या दिवसापासून कव्हर केल्या जातात.
- या योजनेचे फायदे देशभरात पोर्टेबल आहेत म्हणजेच कॅशलेस उपचार घेण्यासाठी लाभार्थी भारतातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात भेट देऊ शकतो. (ऍडमिट होऊ शकतो)
पीएम-जेएवाय प्रधानमंत्री ज्येष्ठ आरोग्य विमा अंतर्गत लाभ कवच PM Sr Citizen Health Plan
- वैद्यकीय तपासणी, उपचार आणि सल्लामसलत
- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी
- औषध आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
- नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह केअर सेवा
- वैद्यकीय प्रत्यारोपण सेवा (आवश्यक असेल तेथे)
- राहण्याचे फायदे
- उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत
- रुग्णालयात दाखल केल्यानंतर १५ दिवसांपर्यंत फॉलो-अप काळजी
प्रधानमंत्री जेष्ठ आरोग्य विमा योजनेसाठी अर्ज कसे कराल?
- सर्वप्रथम आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना च्या वेब साईट ला भेट द्या.
- तुमचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य विमा योजना पोर्टलवर व्हेरिफाय (तपासुन घ्या )करा
- कौटुंबिक ओळखीचे पुरावे द्या
- युनिक AB-PMJAY ID (आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ) आयडी सह तुमचे ई-कार्ड प्रिंट करा.
प्रधानमंत्री ज्येष्ठ आरोग्य विमा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे PM Sr Citizen Health Plan
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे
बऱ्याचदा असे आढळून आले आहे की सरकारने विमा संरक्षण कवच विमा कंपन्यांना मार्फत पुरविले आहे मात्र काही विमा कंपन्या ते कवच लाभार्थी पर्यंत पोहोचविण्यास उशीर करतात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालय गंभीर आजारांवर उपचार करतात मात्र त्यांना सरकारच्या तिजोरीतील पैसा मिळवण्यासाठी प्रदीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते याकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अशा योजना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या अंमलबजावणीत सुलभता आणणे खूप आवश्यक आहे त्याच वेळी रुग्णालयाने सुद्धा या योजनांचा गैरफायदा घेऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. चांगली रुग्ण सेवा देणारी काही खाजगी रुग्णालयाने या योजनेत अंतर्भूतच नाहीत कारण त्यांना सरकारकडून योग्य परतावा मिळत नसल्याची तक्रार आहे. या गोष्टींकडे बघणे सुद्धा सरकारसाठी खूप महत्त्वाचे आहे.