आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सध्या सर्व बाबतीमध्ये महागाई वाढत जात आहे. सामान्य माणसाच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करणं वाढत्या महागाईमुळे अवघड होत चाललं आहे. अनियमित पाऊस, खतांच्या वाढलेल्या किमती,वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव त्यामुळे कमी होणारे शेतीचे उत्पन्न आणि त्या शेतमालाला योग्य वेळी हवा असणारा आवश्यक दर (भाव )न मिळाल्यामुळे बळीराजा हा आर्थिक अडचणीत सापडतो. PM Surya Ghar
अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपला खर्च कमी करू शकलो तर नक्कीच आपण आपल्या पैशांची बचत करू शकतो आणि म्हणूनच आज आपण प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी एका नवीन योजनेची घोषणा केली ज्याचे नाव PM Surya Ghar पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आपल्या भारत देशातील एक कोटी लोकांच्या घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनेल बसवून त्यांचा वीज बिलाचा खर्च शून्यावर आणणे किंवा कमी करणे हे आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळणार आहे ज्यांचे उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची अधिकृत वेबसाइट www.pmsuryaghar.gov.in सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 300 युनिट पर्यंत ची वीज मोफत मिळू शकते. भारतीयांच्या घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या घराची वीज आपणच तयार करावी याला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा एक मुख्य उद्देश आहे त्यामुळे पर्यावरणाचे सुद्धा आपण संवर्धन करू शकतो.
PM Surya Ghar प्रधानमंत्री सूर्य घर: मोफत वीज योजना 2024
PM Suryaghar पीएम सूर्य घर योजना ही एक नवीन योजना आहे, ज्या अंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवले जातील. या योजनेमुळे कोट्यवधी लोकांचे वीज बिल कमी होणार असून लोकांना हरित ऊर्जेचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या सुरुवातीला 1 कोटी लोकांना पीएम सूर्य घर योजनेशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाविषयी माहिती मिळविण्यासाठी येथे दाबा
पीएम सूर्य घर योजनेचे उद्दिष्ट लोकांच्या घरातील विजेचे बिल कमी करणे आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणे हे आहे जेणेकरून भविष्यात इतर स्त्रोतांद्वारे निर्माण होणाऱ्या विजेवर अवलंबून राहणे कमी करता येईल. पर्यावरणाला या योजनेचा फायदा होणार आहे. २९फेब्रुवारी २०२४ ला भारत सरकारने या योजनेला मंजुरी दिली आहे. १६ मार्च २०२४ रोजी या योजनेअंतर्गत ७५ हजार कोटीं पेक्षा जास्त रकमेची सबसिडी भारत सरकार तर्फे मंजूर करण्यात आलेली आहे.
PM Surya Ghar भारत सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना पंतप्रधान सूर्य घर योजनेचा लाभ मिळणार आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या आणि ज्या राज्यात वीज खूप महाग आहे अशा लोकांना या योजनेचा पुरेपूर फायदा मिळणार आहे. प्रधान मंत्री सूर्योदय योजनेसाठी पात्रता/पात्रतेबद्दल अचूक माहिती अधिकृत दस्तऐवज जारी केल्यानंतर दिली जाईल. तज्ज्ञांच्या मते, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना पीएम सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल. पीएम सूर्य घर योजनेच्या पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
PM Suryaghar प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो?
- pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले राज्य निवडायचे आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे मग आपल्या जिल्ह्यातील वीज वितरण कंपनी निवडायची आहे त्यामध्ये आपल्या घरचा वीज मीटरचा कंजूमर अकाउंट नंबर व आपला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे
- आपल्या मोबाईल नंबर ने लॉगिन करून रूफ टॉप सोलर साठी अप्लाय करायचे आहे
- एकदा का तुम्हाला मान्यता मिळाली की मग रजिस्टर वेंडर्स कडून आपल्या घरच्या छतावर रूफ टॉप सोलर पॅनल बसून घ्यायचे आहे.
- रूफ टॉप सोलर पॅनल बसून घेतल्यानंतर आपण घेतलेल्या प्लॅनचे डिटेल्स व त्याच बरोबर मीटर साठी आपल्याला वीज वितरण कंपनीकडे अर्ज करायचा आहे.
- आपल्या येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानंतर प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना पोर्टलवरून आपले ऑनलाईन सर्टिफिकेट दिले जाईल.
- एकदा का आपल्याला पूर्णतेचा रिपोर्ट मिळाला मग प्रधानमंत्री मुफ्त वीज योजनेच्या नॅशनल पोर्टल वर जाऊन आपल्या बँक खात्याची माहिती व एक कॅन्सल चेक सबमिट करायचा आहे. त्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे 30 दिवसाच्या आत सबसिडीचे पैसे आपल्या अकाउंटला जमा होतील..
आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी कशा पद्धतीने सबसिडी देण्यात येईल?
- या योजनेअंतर्गत घरगुती वापरासाठी कमीत कमी एक किलो वॅट आणि जास्तीत जास्त तीन किलो वॅट साठी ही सबसिडी देण्यात येईल
- एका किलोवॅटसाठी तीस हजार आणि दोन किलो वॅट साठी साठ हजार याप्रमाणे ही सबसिडी देण्यात येणार आहे
- एक किलो वॅट चे सरासरी दीडशे युनिट पर्यंत वीज युनिटचा वापर होतो तसेच दोन किलो वॅटसाठी साधारण 300 युनिट पर्यंत दर प्रति महिने वीज युनिटचा वापर होत असतो.
- जर आपल्या घरासाठी 300 युनिट पेक्षा जास्त विजेचा विजेचा वापर होत असेल तर आपण तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक वॅटचे सोलर पॅनल बसवू शकतो परंतु दोन किलो वॅट च्या पुढील एका वॅटसाठी आपल्याला रुपये 18000 एवढीच सबसिडी मिळेल.
- अशा पद्धतीने या योजनेअंतर्गत कमीत कमी 30 हजार रुपये आणि जास्तीत जास्त ७८ हजार रुपये एवढीच सबसिडी आपल्याला मिळू शकते हे लक्षात घ्यावे.