वाचक मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार!
सध्याच्या युगामध्ये शिक्षणाला फार महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर जुन्या काळी थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी सुध्दा शिक्षणाचे महत्त्व समजून सर्व सामान्यांना शिक्षण घेता यावे म्हणून पुण्यामध्ये शाळा काढल्या. मुलींसाठी सुद्धा त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या साह्याने पुण्यात शाळा सुरू केली. PM Vidya Lakshmi
जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या भारत देशात सध्या सर्व मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण मिळत आहे पण तरीसुद्धा अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित आहे अनेक विद्यार्थ्यांना पैशाअभावी त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.
PM Vidya Lakshmi 2024
चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण सुद्धा आता महाग झालेले आहे, आणि म्हणूनच आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेला ६ नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी मान्यता दिल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी रुपये दहा लाख इतके शैक्षणिक कर्ज कोणत्याही तारण विना आणि ठाणेदार विना मिळेल तसेच व्याजदरात तीन टक्क्याची सवलतही मिळेल.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!
PM Vidya Lakshmi पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थेत (क्यूएचईआय) प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी शिक्षण शुल्क आणि संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त आणि गॅरेंटर-मुक्त कर्ज मिळविण्यासाठी पात्र असेल.
विद्यार्थ्याने ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला आहे त्या संस्थेचे संपूर्ण भारतीय लेव्हल वरती रँकिंग १०० पेक्षा कमी असले पाहिजे किंवा राज्य लेव्हल वरती त्याचे त्या संस्थेचे रँकिंग २०० पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे तसेच ती संस्था ही सरकारी संस्था असायला पाहिजे. आता पात्र विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारच्या हमीदाराची आवश्यकता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेताना राहणार नाही प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही भारत सरकारची राष्ट्रीय शिक्षण नीतीचाएक भाग आहे. PM Vidya Lakshmi
पैशांची गुंतवणूक कुठे करावी याविषयी जाणून घेण्यासाठी येथे दाबा.
७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, विद्यार्थ्यांना थकबाकीवर ७५ टक्के क्रेडिट गॅरंटी मिळू शकते, या योजनेंतर्गत ही शैक्षणिक कर्जे प्रदान करण्यात बँकांना मदत होईल. त्याचबरोबर ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापर्यंत रुपया आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना तसेच ज्यांनी इतर सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज अनुदानाचा लाभ घेतलेला नाही त्यांना स्थगिती कालावधी दरम्यान १० लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर ३% टक्के व्याज अनुदान मिळू शकते.
PM Vidya Lakshmi या व्याज अनुदानाचा दरवर्षी जवळजवळ एक लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे जे सरकारी संस्थांमधून आणि तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याच्यात प्राधान्य देण्यात येणार आहे वर्ष २०२४-२५ ते २०३०-३१ या कालावधी दरम्यान ३६०० कोटी रुपयांची बजेटची तरतूद करण्यात आली असून या कालावधीमध्ये ७ लाख नवीन विद्यार्थ्यांना व्याज अनुदानाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
PM Vidya Lakshmi पीएम विद्यालक्ष्मी योजना: अर्ज कसा करावा
स्टेप १ : विद्या लक्ष्मी पोर्टल वर जाऊन अर्जदाराला लॉगिन करावे लागेल आणि स्वतः विषयी माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
स्टेप २ : सर्व आवश्यक तपशील देऊन कॉमन एज्युकेशन लोन ॲप्लिकेशन फॉर्म (सीईएलएएफ) भरा.
स्टेप ३ : फॉर्म भरल्यानंतर, अर्जदार शैक्षणिक कर्ज शोधू शकतो आणि त्याच्या/तिच्या गरजा, पात्रता आणि सोयीनुसार अर्ज करू शकतो.
PM Vidya Lakshmi प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्यास येथे दाबा.
PM Vidya Lakshmi प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट हे संपूर्ण भारतातील तरुणांसाठी दर्जेदार उच्च शिक्षणाचा प्रवेशाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे आहे. त्याचबरोबर गेल्या दशकातील भारत सरकारच्या शिक्षण आणि आर्थिक समावेशन उपक्रमांचा प्रभाव वाढवणे आणि सखोल करणे हे सुद्धा महत्वाचे उद्दिष्ठ आहे. हा उपक्रम केंद्रीय क्षेत्र व्याज अनुदान आणि क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर एज्युकेशन लोन यांना पूरक ठरेल तसेच हे दोन्ही पीएम युएसपी चे भाग आहेत उच्च शिक्षण विभागाच्या देखरेखी खाली या गोष्टींचे पालन करण्यात येईल.
PM Vidya Lakshmi प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा प्रोत्साहन प्रोग्रॅम अंतर्गत तसेच केंद्रीय क्षेत्र व्याज अनुदान उपक्रम या उपक्रमांतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयापर्यंत आहे अशा कुटुंबातील विद्यार्थी जे मान्यता प्राप्त संस्थांमध्ये तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या कालावधीत १० लाख रुपये पर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर पूर्ण व्याज अनुदान मिळू शकते.
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!