नमस्कार वाचक मित्रांनो,
आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये PM Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना विषयी जाणून घेणार आहोत तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आपला देश स्वतंत्र होण्याच्या आधी आपल्या भारतात प्रत्येक गाव हे स्वावलंबी होतं गावातील प्रत्येकाच्या गरजा या गावांमध्येच भागवल्या जात होत्या आणि त्यासाठी बारा बलुतेदार पद्धत खूप महत्त्वाची भूमिका बजावत होती.
बारा बलुतेदार पद्धतीमध्ये शेतकरी सुतार, लोहार, कुंभार ,चांभार इत्यादी अनेक लोकांचा समावेश होता ज्यामध्ये शेतकरी त्याच्याकडील धान्य देऊन इतर गोष्टी उदाहरणार्थ कपडे, भांडी, अवजारे, खरेदी करत होता आणि इतर लोक सुद्धा धान्याच्या बदल्यात त्यांच्याकडे तयार होणाऱ्या गोष्टी या एकमेकांमध्ये विनिमय करत होते.
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये लहान कारागिरांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे जे त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम करतात ते सहसा स्वयंरोजगार करतात आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या अनौपचारिक किंवा असंघटित क्षेत्राचा एक भाग मानले जातात या पारंपरिक कारागिरांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते ज्यामध्ये लोहार कुंभार सुतार शिल्पकार असे अनेक व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक आहेत त्यांचीही कौशल्य किंवा व्यवसाय पिढ्यानपिढ्या पारंपारिक प्रशिक्षणाच्या गुरु आणि शिष्य मॉडेल चे पालन करून कुटुंबातील इतर सदस्यांना शिकवले जातात.
PM Vishwakarma Yojana २०२४
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेद्वारे ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना आणि त्यांच्या सेवेला संपूर्ण देशामध्ये पोहोच वाढवण्याच्या उद्देशाने मदत करणे हा एक उद्देश आहे ही योजना या कुशल व्यक्तींना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे ज्यामुळे ग्रामीण भागातील कारागिरांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधरेल आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता ही वाढेल.
प्रधानमंत्री जेष्ठ नागरिक आरोग्य विमा विषयी माहितीसाठी येथे दाबा
PM Vishwakarma Yojana पीएम विश्वकर्मा योजनेचे मूलभूत उद्दिष्टे-
- ग्रामीण भागातील कारागिरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता मिळणे आणि त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र बनवणे .
- विश्वकर्माचे कौशल्य सुधारण्यासाठी आणि त्यांना संबंधित आणि योग्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य अपग्रेडेशन कारागिरांच्या उत्पादनांची क्षमता उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी त्यांना मदत करणे .
- लाभार्थ्यांनी मुक्त क्रेडिट आणि व्याज सवलतींचा लाभ देणे.
- डिजिटल सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल व्यवहारणांना प्रोत्साहन देणे .
- कारागीरांनी बनविलेल्या कलाकृतींचे ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लींकेज साठी प्लॅटफॉर्म प्रदान करणे. ज्यामुळे त्यांना वाढीच्या नवीन संधीमध्ये प्रवेश करण्यास मदत होईल.
- या उपक्रमाद्वारे अनौपचारिक क्षेत्रातील लाभार्थींना त्यांचे कार्य वाढवण्यासाठी त्यांच्या साधनांच्या आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांची उत्पादकता व उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करणे.
- ही योजना स्वयंरोजगार असलेल्या विश्वकर्मांना अनेक फायदे उपलब्ध करून देणारी आहे किंवा त्यांचा स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याचा मानस आहे आणि अशा व्यक्तींना कौशल्य विकासाद्वारे फायदेशीर ठरणार आहे.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही संपूर्णपणे भारत सरकार द्वारे चालवली जाणार आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये १३००० करोड रुपये या योजनेमध्ये खर्च करण्यात येणार आहे.
- सुरुवातीला ही योजना पाच वर्षांसाठी लागू करण्यात आलेली आहे.
PM Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळेल
- योजनेची अंमलबजावणी ग्रामीण आणि शहरी भागात टप्प्याटप्प्याने जिल्हास्तरावर केली जाईल.
- अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती, ओबीसी, विशेष सक्षम व्यक्ती, ट्रान्सजेंडर एन इ आर राज्यातील रहिवासी आणि डोंगराळ प्रदेश यासारख्या महिला आणि उपेक्षित गटांचा सक्षमीकरणत विशेष लक्ष दिले जाईल.
- ग्रामीण तसेच शहरी भागातील लाकडाचे काम करणारे सुतार, बोट बनविणारे ,लोखंडाचे काम करणारे लोहार, सोनार, कपडे शिवणारे शिंपी, विणकाम करणारे, कपडे धुणारे धोबी , मूर्ती बनविणारे शिल्पकार ,न्हावी,चांभार, माळी माळा बनवणारे, अनेक कारागिरीच्या यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
PM Vishwakarma Yojana पीएम विश्वकर्मा योजना आर्थिक सहाय्य-
पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभ घेण्यासाठी कारागिरांनी बेसिक ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे की जे चार ते पाच दिवसाचे असेल या ट्रेनिंग कालावधीमध्ये कारागिरांना ५०० रुपये प्रति दिवस प्रमाणे मानधन सुद्धा दिले जाणार आहे .
- ट्रेनिंग केलेल्या पात्र उमेदवारांना सुरुवातीला रुपये 1 लाखाचे कर्ज मंजूर करण्यात येईल
- रुपये एक लाखाचे कर्ज लाभार्थींना १८ महिन्यांमध्ये परतफेड करायचे असेल.
- प्रथम टप्प्यातील कर्जाची परतफेड झाल्यानंतर कारागीर पुन्हा रुपये 2 लाखाचे कर्ज स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी घेण्यास पात्र होऊ शकतो.
- नव्याने घेतलेले रुपये दोन लाखाचे कर्ज कारागिरांनी 30 महिन्यांमध्ये परतफेड करायचे आहे.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेद्वारे जे कर्ज दिले जाणारआहे त्यासाठी फिक्स ५ % याप्रमाणे व्याजाची आकारणी करणे करण्यात येणार आहे.
- लँडिंग संस्थांद्वारे सर्व कर्ज सत्रांसाठी श्रेणीबद्ध हमी कव्हर सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड हस्तांतरणाद्वारे संरक्षित केले जाईल जे पोर्टफोलिओ आधारावर ऑपरेट केले जातील.
PM Vishwakarma Yojana पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसे कराल
- आपल्या गावातील किंवा शहरातील सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.
-
पीएम विश्वकर्मा योजने विषयी अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे दाबा.