Rabi Crop Insurance रब्बी पिकांची विम्याची मुदत संपली का ?

शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार !

आपल्या महाराष्ट्रात सध्या थंडीचे प्रमाण हे हळूहळू वाढत आहे, तसेच खरीप हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येत आहे काही शेतकरी बांधवांनी तर रब्बी हंगामाची सुरुवात देखील केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. Rabi Crop Insurance

खरीप हंगामामध्ये आपण बघितले की महाराष्ट्रात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि म्हणूनच पिक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली आहे.

                   महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

Rabi Crop Insurance प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०१६ पासून सुरू करण्यात आली होती ज्यायोगे शेतक-यांच्या पिकांना पेरणीपूर्वीपासून काढणीनंतरच्या अवस्थेपर्यंत सर्व न टाळता येण्याजोग्या नैसर्गिक जोखमींविरूद्ध सर्वसमावेशक जोखीम कव्हर सुनिश्चित करण्यासाठी परवडणारी पीक विमा उत्पादने प्रदान करून शेतीच्या उत्पादनास समर्थन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली.

हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे दाबा

Rabi Crop Insurance 2024

पिक विमा योजनेचे मुख्य उद्दिष्टे:-

  • अनपेक्षित घटनांमुळे पिकाचे नुकसान किंवा नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे, त्यांच्या शेतीत सातत्य राखणे.
  • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांच्या पीक वैविध्यतेच्या क्रेडिट पात्रतेचा विमा काढणे आणि कृषी क्षेत्राची वाढ आणि स्पर्धात्मकता वाढवणे यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पादन जोखमीपासून संरक्षण करणे.

Rabi Crop Insurance योजनेसाठी पात्र शेतकरी कोणते:-

  • विमा पात्र शेतकरी, कर्जदार, बिगर कर्जदार ,भाडेपट्टीवर शेती करणारे, इत्यादी सर्व शेतकरी.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि ज्या कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांक च्या सात दिवस आधी अनिवार्य संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या अनुसूचित पिकाचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल.
  • बिगर कर्जदार शेतकरी- ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत किंवा विमा मध्यस्थ द्वारे किंवा सीएससी केंद्रात संकेतस्थळावर अंतिम मुदतपूर्वी जमा करावी.
  • कुळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार अपलोड करणे बंधनकारक आहे.
                            शेतकऱ्यांसाठी पिक विमा हप्ता फक्त रुपया प्रति अर्ज

Rabi Crop Insurance विमा संरक्षित बाबी:

  • योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती गारपिट भूसखलन विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी वीज कोसळल्याने लागणारी नैसर्गिक आग इत्यादी व काढणी पश्चात नुकसान भरपाई जसे गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस या बाबी अंतर्गत सुकविण्यासाठी  शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर १४ दिवसांपर्यंत झालेल्या नुकसानाची पूर्व सूचना नुकसानीच्या ७२ तासाच्या आत कृषिरक्षक स्थान संकेतस्थळ सहाय्यता क्रमांक संबंधित बँक कृषी विभाग यांना द्यावे सदरचे जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांनाच लागू होईल.
  • योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रात ही कापणी प्रयोगाद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून येणाऱ्या घटनेनुसार योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून अधिसूचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे?

  • आपल्या महाराष्ट्रात रब्बी पिकांची लागवड साधारण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू होते
  • शेतकरी बंधूंनो रब्बी ज्वारी साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत ही ३० नोव्हेंबर २०२४ ही होती.
  • बागायती गहू पिकासाठी व हरभरा पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ ही निश्चित केली गेलेली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये पीक विमा अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती.
  • यंदाच्या वर्षी रब्बी कांद्यासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे
  • महाराष्ट्रात काही ठिकाणी उन्हाळी भात तसेच उन्हाळी भूमी भुईमूग सुद्धा घेतले जाते आणि म्हणूनच प्रधानमंत्री पिक विमा योजने साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०२५ घोषित करण्यात आलेले आहे.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी ती आपणास या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अथवा जिल्हा किंवा तालुका विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना लागू अधिसुचित पिके  अधिसुचित महसूल मंडळाची यादी व महाराष्ट्र शासनाची  अधिसूचना नजीकच्या बँक शाखेत, सहकारी पतपुरवठा संस्था यांच्याकडे ऊपलब्ध आहे.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा व्हाट्सअप नंबर  7065514447( ७०६५५१४४४७) हा आहे.
                   महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

Leave a Comment