वाचक मित्रांनो नमस्कार ,
तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!! तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य चांगले ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा आरोग्याला अन्यन्य साधारण महत्व दिले गेलेले आहे म्हणूनच म्हणतात आरोग्यम धनसंपदा. ज्याला इंग्लिश मध्ये म्हटले जाते हेल्थ इज वेल्थ. (Health is Wealth) Sakhar Meeth
मागच्या आठवड्यातच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे कि आपल्या देशात वापरले जाणारे सर्वच ब्रँडचे Sakhar Meeth साखर आणि मीठ यामध्ये मायक्रो प्लास्टिकचे अंश आढळून आले आहेत. लहान ब्रँड असो अथवा मोठा पॅकिंग केलेले असो अथवा सुटे सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात मायक्रो प्लास्टिकचे तुकडे सापडले आहेत. सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रो प्लास्टिक हे फायबर, पॅलेट्स , आणि तुकड्यांच्या माध्यमातून आढळून आले.
आपल्या साखर आणि मिठात प्लास्टिक तर नाही ?
पर्यावरण संशोधन संस्था टॉक्सिक लिंक यांनी दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी एक शोध निबंध प्रसिध्द केला. त्यांनी अभ्यासासाठी Sakhar Meeth साखर, मिठाचे वेगवेगळे दहा प्रकारचे नमुने घेतले होते ज्यामध्ये घरात वापरले जाणारे पॅकेज आयोडीनयुक्त मीठ, त्याचबरोबर समुद्रमीठ ,कच्चे मीठ यांच्यावर चाचण्या घेण्यात आल्या. तसेच पाच साखरेचे नमुने हे ऑनलाइन व दुसरे पाच साखरेचे नमुने हे स्वतः बाजारात जाऊन विकत घेण्यात आले आणि त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या अभ्यासात असे आढळून आले की सर्व प्रकारच्या मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रो प्लास्टिकचे ०.१ मिलीमीटर ते ५ मिलीमीटर पर्यंत वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जसे फायबर पॅलेट्स, फिल्म, बारीक तुकडे या अवस्थांमध्ये आढळून आले.
लाडका भाऊ योजनेच्या माहितीसाठी येथे दाबा
मायक्रो प्लास्टिकचे सर्वात जास्त प्रमाण हे आयोडीन युक्त मिठामध्ये आढळून आले. आपल्या देशात Sakhar Meeth साखरेचे आणि मिठाचे सेवन करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे .एका अभ्यासानुसार आढळून आले आहे की सरासरी भारतीय दररोज १० ग्राम मीठ आणि १० चमचे साखरेचे सेवन करत असतो. याचा अर्थ एक व्यक्ती वर्षभरामध्ये साधारण ३.५ किलो पेक्षा जास्त मीठ आणि १५ किलो पेक्षा जास्त साखरेचे सेवन करत असतो.
टॉक्सिक्स लिंकच्या अभ्यासात असे आढळून आले की मिठाच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण ६. ७१ ते ८९. १५ तुकडे प्रति किलो वजनाच्या दरम्यान होते. साखरेच्या नमुन्यांमध्ये, मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण ११. ८५ ते ६८.२५ तुकडे प्रति किलो इतके होते. “मानव आयुष्यभर मीठ आणि साखर असलेली अन्न उत्पादने वापरत असल्याने, MPs (मायक्रोप्लास्टिक्स) चे सेवन देखील लक्षणीय असणे अपेक्षित आहे.
Sakhar Meeth अभ्यासानुसार, जर तुम्ही सेंद्रिय (Organic) साखर किंवा सेंद्रिय रॉक मिठाचे सेवन केले तर तुम्हाला थोडे चांगले होईल कारण त्यांच्यामध्ये प्लास्टिकच्या कणांचे प्रमाण कमी असते. पॅक केलेले आयोडीन युक्त मीठावर ज्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते आणि पॅकिंग केली जाते त्याच ठिकाणी मायक्रो प्लॅस्टिक चे भेसळ होण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून पॅकिंग आणि प्रोसेसिंग प्रक्रिया करायच्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष देऊन स्वच्छता पूर्ण आरोग्यदायी व्यवस्था राखण्याची खुप गरज आहे.
टॉक्सिक्स लिंकचे संस्थापक-संचालक रवी अग्रवाल म्हणाले, “आमच्या अभ्यासाचे उद्दिष्ट मायक्रोप्लास्टिक्सवरील विद्यमान वैज्ञानिक डेटाबेसमध्ये योगदान देणे हे होते जेणेकरुन जागतिक प्लास्टिक करार या समस्येला ठोस आणि केंद्रित पद्धतीने सोडवू शकेल.” आम्ही मायक्रो प्लास्टिक या समस्येवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तसेच जागतिक संशोधकांना या बाबतीत जास्त प्रकारे संशोधन करण्यासाठी प्रेरित करतो जेणेकरून भविष्यात मायक्रो प्लास्टिक पासून उद्भवणारे संभाव्य धोके कमी करता येतील
लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी येथे दाबा
मीठातील प्लास्टिकचे अंश
टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा पुढे म्हणाले, “आमच्या अभ्यासात सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहेत आणि मानवी आरोग्यावर मायक्रोप्लास्टिक्सच्या दीर्घकालीन आरोग्यावरील परिणामांवर तातडीने, व्यापक संशोधनाची गरज आहे.” मिठाच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण ६.७१ ते ८९.१५ तुकडे प्रति किलो कोरड्या वजनाच्या (dry weight) दरम्यान होते, असे अहवालात म्हटले आहे.आयोडीनयुक्त मिठात मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण सर्वाधिक होते ८९.१५ तुकडे प्रति किलोग्रॅम तर सेंद्रिय रॉक मीठ सर्वात कमी ६.७१ तुकडे प्रति किलोग्रॅम होते.
साखरेतील प्लास्टिकचे अंश
साखरेच्या नमुन्यांमध्ये, मायक्रोप्लास्टिक्सची एकाग्रता प्रति किलोग्रॅम ११. ८५ ते ६८. २५ तुकड्यांपर्यंत होती, ज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण नॉन-ऑर्गेनिक साखरेमध्ये आढळते. मायक्रोप्लास्टिक्स ही वाढती जागतिक चिंतेची बाब आहे कारण ते आरोग्य आणि पर्यावरण दोघांनाही हानी पोहोचवू शकतात. हे छोटे प्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवा यांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. कालांतराने आपल्या शरीरात वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर आजार यामुळे होऊ शकतात. Sakhar Meeth
महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
मायक्रो प्लास्टिक युक्त साखर आणि मिठापासून वाचण्याचे उपाय Sakhar Meeth
या समस्येपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर आणि मीठ यांचे सेवन करण्याचे प्रमाण कमी करणे. शक्य असल्यास ऑरगॅनिक पद्धतीने तयार केलेले मीठ किंवा सैंधव मीठ किंवा काळे मीठ यांचा वापर करणे. त्याचबरोबर साखरेचे सुद्धा रोजच्या जीवनात वापरायचे प्रमाण कमी करणे शक्य असल्यास ऑरगॅनिक पद्धतीने तयार केलेली साखर खाण्यासाठी वापरणे. साखर आणि मीठ तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये पॅकेजिंग हाऊस मध्ये स्वच्छता पूर्ण आरोग्यदायी व्यवस्था राखण्याची खुप गरज आहे.