वाचक मित्रांनो नमस्कार,
आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो म्हणजे जास्त मोबाईल वापरल्याने मुलांवर होणारे दुष्परिणाम!!! Screen Time
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे स्मार्ट मोबाइल फोन्सचा वापर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज च्या घडीला घरात जेवढे लोक आहेत तितकेच फोन सुद्धा आहेत भारताची लोकसंख्या १४० कोटीच्या पुढे गेलेली आहे. यावरून तुम्ही आपल्या देशातील मोबाईल वापरकर्त्यांचा अंदाज घेऊ शकतात Screen Time
Screen Time आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे अशा परिस्थितीत मोबाईल फोन शिवाय राहणे जवळपास अशक्य झालेले आहे परंतु आपण सर्वांनी आपल्या संस्कृतीत सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे II अति सर्वत्र वर्जते II अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा धोकेदायक किंवा हानिकारक असतो.
कापूस पिकातील फुलपाती गळ आणि मर रोग थांबवण्यासाठी येथे दाबा.
रेड शीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट यांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार सर्वसाधारण भारतीय व्यक्ती हा मोबाईल Screen Time स्मार्टफोनचा दिवसभरामध्ये ६ तासांपेक्षा जास्त वापर करत आहे जो अमेरिका आणि चायना या दोन देशांच्या लोकांच्या मोबाईल वापरण्याच्या जवळपास आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जास्त वापर हा युट्युब, इंस्टाग्राम फेसबुक, आणि व्हाट्सअप यांचा आहे. आपण सर्वांनी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे की सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या आभासी स्वरूपाच्या असतात वास्तविक जगाशी त्यांचा फारसा संबंध नसतो.
स्मार्ट मोबाइल फोन च्या अतिवापरामुळे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांवरती अनेक प्रकारचे दुष्परिणाम आढळून आलेले आहेत.
Screen Time स्मार्ट मोबाइल फोन चे दुष्परिणाम
- एकाग्रतेचा अभाव-मोबाईल फोनवर येणाऱ्या सततच्या सूचना आणि सोशल मीडिया अपडेट्स लहान मुलांचे लक्ष विचलित करू शकते.
- झोपेचा त्रास- जे विद्यार्थी झोपण्यापूर्वी मोबाईलचा जास्त वापर करतात त्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल फोन द्वारे उत्सर्जित होणारा निळा प्रकाश झोपेचे नियमन करणारे हार्मोन मेलाटोनीन च्या निर्मितीमध्ये हस्तक्षेप करतो त्यामुळे अनियमित झोपेचा त्रास होतो व दिवसा काम करण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
- खराब शैक्षणिक कामगिरी-अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे विद्यार्थी त्यांच्या मोबाईल फोनवर जास्त वेळ घालवतात त्यांना कमी ग्रेड मिळतात. त्यांचा बराचसा वेळ सोशल मीडियामध्ये वाया गेल्याने अभ्यासासाठी गृहपाठासाठी पुरेसा वेळ मिळत नाही
- दृष्टी समस्या-मोबाइल फोनचा दीर्घकाळ वापर केल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे डोळे कोरडे, अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो
वरील सर्व दुष्परिणाम हे केवळ लहान मुलांमध्येच नव्हे तर मध्यम वयातील मुले तसेच मोठ्यांमध्ये सुद्धा दिसून आलेले आहेत
Screen Time स्क्रीन टाईम चा प्रश्न केवळ भारतापुरताच मर्यादित नसून अमेरिका, चायना, स्वीडन, थायलंड यासारखे जगातील अनेक देशांमध्ये हा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे काही देशांनी आता मोबाईल स्क्रीन टाईम च्या वापरा संदर्भात शिफारशी लागू करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये स्वीडन सरकार सर्वात अग्रेसर आहे
स्वीडन सरकारच्या काय आहेत शिफारशी Screen Time
स्वीडनच्या सरकारने १८ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी स्क्रीन टाईम संदर्भामध्ये नवीन शिफारशी आणल्या आहेत या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. स्वीडनमध्ये येथून पुढे दोन वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजन पाहण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.
Screen Time सध्या मोठ्यांचाच नाही तर लहान मुलांच्या स्क्रीन टाईम चे प्रमाण प्रचंड वाढले आहे त्याचा परिणाम म्हणजे एकाच ठिकाणी बराच वेळ बसून मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याने स्थूलपणा वाढत आहे व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
स्वीडनचे आरोग्यमंत्री जेकब फोर्समेड यांनी सध्या मर्यादेपेक्षा अधिक स्क्रीन टाईम होत असल्याने पंधरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना पुरेशी झोप मिळत नसल्याचे सांगितले १३ ते १८ वयोगटातील मुलांना स्क्रीन समोर दिवसभरात दोन ते तीन तास राहण्याची शिफारस केलेली आहे रात्री झोपण्यापूर्वी मुलांनी स्क्रीन पाहू नये असा सल्ला स्वीडन सरकारने दिला आहे. त्याचबरोबर पालकांना सुद्धा विनंती केली आहे की रात्रीच्या वेळी मुलांच्या बेडरूम मध्ये फोन आणि टॅबलेट ठेवू नये
दोन ते पाच वर्षाच्या वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाईम हा १ तासापेक्षा अधिक काळ असू नये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सहा ते बारा वयोगटातील मुले यांच्या स्क्रीन टाईम दररोज एक ते दोन तासापर्यंतच मर्यादित ठेवणे तसेच १३ ते १८ वयोगटातील मुलांना स्क्रीन टाईम दररोज २ ते ३ तासांपेक्षा जास्तीचा असू नये असेही स्वीडन सरकारच्या शिफारशींमध्ये सांगण्यात आलेले आहे.
आपण सुद्धा यापासून बोध घेऊन आपल्या पाल्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना कराव्या. कारण मुलं ही आपलीच आहेत आणि त्यांचे भविष्य ही आपल्याच हातात आहे.