Wheat Cultivation गहू पिकाची लागवड

शेतकरी बंधू व भगिनींना, नमस्कार!

कुबेराची धनसंपदा तथा  धन्वंतरीची आरोग्य संपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये दिवाळीनंतर रब्बी हंगामामध्ये आपल्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांपैकी एक गहू (Wheat Cultivation) या पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात दरवर्षी साधारण १०. ४० लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी  केली जाते.

Wheat Cultivation मित्रांनो गहू या रब्बी पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी थंड वातावरण असणे हे खूप आवश्यक असते. या वर्षी दिनांक ४ नोव्हेंबर पासून ते १५नोव्हेंबर पर्यंत थंडीचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल त्यानंतर १५ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान कडाक्याची थंडी पडू शकते. तसेच तारीख १५ जानेवारीपासून ते तारीख १५ फेब्रुवारी दरम्यान थंडीचा कडाका हळूहळू कमी होईल त्याचबरोबर दिनांक १५ फेब्रुवारीपासून ते १ मार्च दरम्यान थंडीचे प्रमाण आणखी कमी होईल व पुढील पंधरा दिवसांमध्ये म्हणजेच १५ मार्चपर्यंत थंडी संपेल  असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी  व्यक्त केलेला आहे.

Wheat Cultivation

Wheat Cultivation  गहू लागवड तंत्रज्ञान २०२४

जमिनीची मशागत:

बागायती गहू पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन योग्य असते थंडीचे दिवस जितके जास्त मिळतील तेवढेच  पीक वाढीस पोषक ठरवून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते गव्हाच्या जास्त उत्पादना करतात थंडीचे किमान १०० दिवस मिळणे आवश्यक असते आपण घेतलेल्या खरीप पिकानंतर लगेचच खोल नांगरणी करून व वखाराच्या तीन ते चार पाळ्या  देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि उताराला आडवे सारे पाडून गहू पेरणीसाठी जमीन तयार करावी. शक्य असल्यास मशागत करते वेळी एकरी दहा ते बारा गाड्या चांगली कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.

गहू पेरणीची योग्य वेळ:

मित्रांनो कोरडवाहू गव्हाची पेरणी ऑक्टोबर च्या  दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू करू शकतात. तर बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात  केलेली योग्य असते.  तसेच बागायती गहू पेरणी १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी.

कापूस बाजार भाव अंदाज जाणून घेण्यासाठी येथे दाबा

 बियाण्याचे प्रमाण:

कोरडवाहू पेरणीसाठी प्रति एकर ३० किलो बियाणे वापरावे. तसेच बागायती वेळेवर पेरणीसाठी प्रति एकर ४० किलो बियाणे वापरावे  जर बागायती पेरणी उशिरा करत असाल तर   एकरी ५० किलो बियाण्याचा वापर करावा.

Wheat Cultivation पेरणी :

कोरडवाहू गव्हाची पेरणी करत असताना जमिनीत पुरेसा ओलावा आहे  का याची खात्री करावी आणि बियाणे ओलाव्यात पडेल याची संपूर्ण काळजी घ्यावी. बागायती पेरणीच्या वेळेस जमिनीत पुरेशी ओल  नसल्यास जमीन ओलीत  करून घ्यावी व मगच  पेरणी करावी. पेरणीवेळी  दोन ओळींमध्ये 20-22 सेंटीमीटर अंतर ठेवावे तसेच गव्हाची बियाणे पेरणीच्या वेळी ५ ते ६ सेंटीमीटर पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. Wheat Cultivation

 रासायनिक खते  नियोजन: Wheat Cultivation

बागायती पेरणीसाठी युरिया दोन बॅग व एक बॅग डीएपी तसेच एक बॅग पोटॅश एवढ्या रासायनिक खताची मात्रा द्यावी यामध्ये एक बॅग यूरिया, एक बॅग  पोटॅश व एक बॅग डीएपी पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेली एक बॅग यूरिया पहिल्या पाण्याच्या वेळी म्हणजेच १८ ते २० दिवसानंतर द्यावे.

आंतरमशागत:

पेरणी पासून ३० ते ३५ दिवसाच्या आत तणांचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदण  करून घ्यावे.

पाणी/ ओलित  व्यवस्थापन:

Wheat Cultivation बागायती गहू पिकासाठी साधारण ५ ते ६ वेळेस पाणी द्यायला लागते गहू पिकाच्या नाजूक अवस्थांमध्ये पाण्याच्या ताण  शक्यतो पडू देऊ नये पेरणीपूर्वी शेताला पाणी देणे आवश्यक आहे.

.क्र. पीक वाढीच्या नाजूक अवस्था पीक पेरणीनंतरचे दिवस
मुकुट मुळे फुटण्याची सुरुवात १८ ते २० दिवस
जास्तीत जास्त फुटवे अवस्था ३० ते ३५ दिवस
कांडी  धरण्याची उशिरा अवस्था ४५ ते ५० दिवस
फुलोरा अवस्था ६५ ते ७० दिवस
दाण्यांची दुधाळ अवस्था ८० ते ८५ दिवस
दाण्यात चिकाची अवस्था ९५ ते १०० दिवस

जर आपल्याकडे पाणीपुरवठा मर्यादित असेल तर खाली दिलेल्या शिफारशीप्रमाणे पाणी द्यावे.

.क्र. मर्यादित पाणीपुरवठा असल्यास पीक वाढीच्या नाजूक अवस्था पीक पेरणीनंतरचे दिवस
एकच ओलित कांडी  धरण्याची उशिरा अवस्था ४५ ते ५० दिवस
दोन ओलित मुकुट मुळे फुटण्याची सुरुवात आणि फुलोरा अवस्था १८ ते 20 दिवस आणि ६० ते ६५ दिवसांनी
3 तीन ओलित मुकुट मुळे फुटण्याची सुरुवात,कांडी धरणाची अवस्था आणि फुलोरा अवस्था १८ ते २०, ४० ते ४५, ६० ते ६५ दिवसांनी

 

Wheat Cultivation

वाणाची निवड: Wheat Cultivation

कोरडवाहू क्षेत्रासाठी (AKDW) २९९७ शरद, पी डी के वी वाशिम (WSM १४७२) एम ए सी एस १९६७, NI १४१५ या वाणांची निवड करावी. बागायती पेरणीसाठी पूर्णा, विमल ,एचडी २१८९. पीडीकेव्ही सरदार. यापैकी कुठलेही वाणाची निवड करू शकतात.

त्याचबरोबर श्रीराम फार्म सोल्युशन्स कंपनीची श्रीराम सुपर १११ आणि श्रीराम सुपर ३०३ या वाणाची सुद्धा तुम्ही बागायती लवकर आणि उशिरा  पेरणीसाठी निवड करू शकता.

कापणी व मळणी:

गव्हाचे पीक साधारणता १०० दिवसापासून ते १२० दिवसांमध्ये परिपक्व होत असते पीक पक्व  होताच कापणी करावी आणि शेतामध्ये योग्य जागेवर  गंजी लावावी मळणी यंत्राने मळणी करत असताना दाणे फुटणार नाही याची काळजी घ्यावी.

            महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!!!

 

Leave a Comment